#RahulAakroshRally राहुलजींचे जोशपूर्ण भाषण; कर्नाटकसह २०१९ जिंकणार – eNavakal
देश राजकीय

#RahulAakroshRally राहुलजींचे जोशपूर्ण भाषण; कर्नाटकसह २०१९ जिंकणार

नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाच्या ‘जनआक्रोश रॅली’मध्ये रामलीला मैदानावर राहुल गांधी यांनी अतिशय आत्मविश्वासाने जोशपूर्ण भाषण केले आणि राहुल गांधीना ‘पप्पु’ म्हणून हिणविणाऱ्यांना जोरदार थप्पड मारली. राहुल गांधी कार्यकर्त्यांना म्हणाले की, मोदीजी खोटे बोलत होते ते आता उघड होत आहे. आता कॉंग्रेस कार्यकर्त्यांची जिद्द आणि पाठींब्याने कॉंग्रेसचा कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत विजय होईलच, पण २०१९ ची लोकसभा निवडणूकही कॉंग्रेसच जिंकणार आहे.

कॉंग्रेसच्या सभेसाठी रामलीला मैदान गच्च भरले होते. राहुल गांधी कॉंग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या पक्षाची ही पहिलीच जाहीर सभा होती, यामुळे राहुल गांधी मैदान जिंकतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष होते. राहुलजींनी अत्यंत जोशपूर्ण भाषण केले, भाजप, संघ आणि पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका करीत सर्व विषयांना स्पर्श करीत कार्यकर्त्यांमध्ये चेतना निर्माण केली. आजच्या भाषणामुळे ‘पप्पू’ची प्रतिमा नष्ट होऊन नेत्याची शबी जनतेसमोर उभी राहिली.

राहील गांधींनी अर्धा तास भाषण केले, आपल्या भाषणात ते म्हणाले की, सामान्य माणूस न्याय मागण्यासाठी न्यायालयात जातात. पण प्रथमच सर्वोच्च न्यायालयाचे ४ न्यायमूर्ती जनतेपुढे येऊन न्याय मागतात. मोदीजी चूप. प्रत्येक ठिकाणी संघाची माणसे बसवली जात आहेत. भारतातील व्यवस्था तोडून टाकत आहेत. तरी मोदीजी चूप. पंतप्रधान रोजगार देणार होते. पण आज रोजगार तर नाहीच, बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. युवकांपुढे समस्या आहे, शेतकऱ्यांपुढे समस्या आहे. शेतकरी रोज घाम गळतात, पण त्यांचे एक रुपयाचे कर्ज हे सरकार माफ करीत नाही. मोदीजी हमीभावही देत नाही. अरुण जेटली म्हणतात की, कर्जमाफी हे आमचे धोरण नाही. जर कॉंग्रेस पक्ष नसेल तर शेतकरी या देशात जगू शकणार नाही.

रोहित वेमुला अभ्यास करतो तर त्याला चिरडून टाकले. मध्यप्रदेशात दलित, आदिवासींवर अत्याचार होतात, पण मोदी गप्प. इथे महिलांवर अत्याचार होतात. जम्मू काश्मीर, मध्य प्रदेशात महिलेवर अत्याचार होतात. पंतप्रधानांना पदेशात प्रश्न विचारला. ७० वर्षांत हे प्रथमच घडले. चीनमध्ये पंतप्रधान विनाअजेंडा चर्चा करीत बसले आहेत. पंतप्रधानांनी डोकलामचा विषयही काढला नाही. गेल्या ७० वर्षांत कोणत्याही पंतप्रधानाने असे काम केले नाही.

भाजपा, संघवाले जिथे जातात तिथे वितुष्ट निर्माण करतात. भारत हा प्रेमाचा देश आहे. पंतप्रधान म्हणाले होते की, कॉंग्रेसने ६० वर्षांत काही केले नाही  मला ६० महिने द्या. या ६० महिन्यात पंतप्रधानांनी गब्बर सिंग कर लावला, नोटबंदी केली, शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावली, दलित आदिवासींवर अत्याचार केले. इमारतीचा पाया पाणी मारून मजबूत होतो. कॉंग्रेस म्हणजे पाणी आहे. या पाण्यामुळेच इमारत भक्कम होते. पाणी हे प्रेमाचे प्रतिक आहे. कॉंग्रेसने प्रेम वाढवून महिला, दलित, आदिवासी, मागासवर्गिय सर्वांना एकजूटीत ठेऊन न्याय दिला.

नरेंद्र मोदींनी आतापर्यंत असत्य पसरवले. पण आता त्यांचा खोटेपणा उघड होत आहे. कॉंग्रेसची सच्चाई दिसत आहे. गुजरामध्ये नरेंद्र मोदींनी पोलिसांपासून सर्वांना हाताशी धरले, पण कॉंग्रेसचा कार्यकर्ता ताठ उभा राहिला आणि मोदींना सी प्लेनमध्ये बसायला लावले. हाच कॉंग्रेसचा कार्यकर्ता हा वाघाचा बच्चा आहे. तो कर्नाटकाच्या प्रत्येक बुथवर उभा आहे. या कार्यकर्त्यांमुळे कॉंग्रेस कर्नाटकात जिंकेल, राजस्थानात जिंकेल, छत्तीसगढ जिंकेल, मध्यप्रदेश जिंकेल, आणि जिंकत जाऊन २०१९ची निवडणूक जिंकेल, कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्तेसाठी प्राण दिले नाहीत, सत्यासाठी प्राण अर्पण केलेत. ही कॉंग्रेस पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे. इथे युवा आहेत. अनुभवी जेष्ठ आहेत, तुम्हा सर्वांना आदर मिळेल, स्थान मिळेल, इथे नेत्यांची कमतरता नाही, प्रत्येकात काही ना काही गुण आहेत. आमच्यात वेगवेगळ्या विचारांचे नेते आहेत, मी स्वतंत्र विचारांचा सन्मान करतो. पण जेव्हा संघाशी लढायचे आहे, तेव्हा एकजूट राहिली पाहिजे.

भाजपात हे चालत नाही. तिथे फक्त मोदी आणि शहांचे विचार चालतात. त्यांचाच आदर होतो. जेटलींचा आदर होत नाही, हे ठीक नाही. कॉंग्रेस विविधता मानते, वेगवेगळे विचार मानते. या गोष्टीला आम्ही शक्ती देणार आहोत.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुरामुळे साखर महाग झाली दुसर्‍यांदा दरवाढ! 40 रुपये किलो

कोल्हापूर – पूरस्थिती पूर्णपणे निवळत चालली असली तरी या कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा फटका साखरेला बसला आहे. साखरेचे भाव दुसर्‍यांदा वाढले आहेत. मागील आठवड्यात...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

राज्यातील महापूर प्रशासकीय गलथानामुळे आरोप करणारी जनहित याचिका हायकोर्टात

मुंबई – कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही प्रशासकीय गलथानपणा आणि धरणातील पाणी सोडण्यासंदर्भात केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशांचे बेदरकार उल्लंघन झाल्याचा आरोप करून कर्नाटक...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बीडच्या 15 गावातील विदारक चित्र

बीड – जिल्ह्यातील वडवली तालुक्यात शेतकर्‍यांचे विदारक चित्र दिसत आहे. दोन महिन्यांपासून पावसाचा थेंबही न पडल्याने पिके करपत चालली आहेत. त्यामुळे तालुक्यातील 15 गावातील...
Read More