राहुलजींच्या आकलनशक्तीची कीव येते- पात्रा – eNavakal
News देश

राहुलजींच्या आकलनशक्तीची कीव येते- पात्रा

नवी दिल्ली – पंतप्रधान होण्याची मनिषा बाळगणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आकलनशक्तीची मला कीव येते, असे विधान भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी केले. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भातील पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सांबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ जोडला आहे.

या भाषणात राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामागे छत्तीसगढमधील सेलफोन घोटाळ्याचा संदर्भ आहे. हे मोबाईल सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीकडून का विकत घेतले नाहीत, असे राहुल गांधींना बोलायचे होते. मात्र, भाषणाच्या ओघात त्यांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) या दोन कंपन्यांच्या नावात चुक केली. बीईएल ही कंपनी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाची (ट्राय) सदस्य आहे. मात्र, राहुल गांधी यांनी भाषणात बीईएलऐवजी भेल असा उल्लेख केला. नरेंद्र मोदी यांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) या कंपनीकडून मोबाईल फोन खरेदी का केला नाही? असा सवाल त्यांनी विचारला होता. यावरून भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी राहुल गांधींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान होण्याची मनिषा बाळगणार्‍या व्यक्तीची समज या स्तरावर आहे. हे खरंच एका परिपक्व राजकारण्याचे लक्षण असल्याची उपरोधिक टीका सांबित पात्रा यांनी केली.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

लातूरात वाळू तस्करांवर 13 लाखांची दंडात्मक कारवाई

लातूर- मांजरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करावर लातूर तहसीलदारांनी कारवाई केली. यामध्ये नऊ वाहने जप्त करीत तब्बल 13 लाखांचा दंड वसूल करण्यात...
Read More
post-image
News देश

तुंगनाथ तीर्थक्षेत्र लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार

रुद्रप्रयाग – रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तृतीय केदार तुंगनाथ तीर्थक्षेत्रही लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो पर्यटक येतात. यासोबतच क्रौंच पर्वतावरील कार्तिक स्वामींचे मंदिरदेखील झळाळणार...
Read More
post-image
News देश

नवी दिल्ली-चंदिगढ रेल्वे प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आणि पंजाब-हरियाणा राज्यांची राजधानी चंदिगढ यांच्यामधील प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार आहे. या प्रवासाचा फक्त वेळच कमी...
Read More
post-image
News देश

राफेल विमान खरेदी! राहुल गांधी आज करणार नेत्यांशी चर्चा

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चालू असलेले राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन भाजपाला घेरण्यासाठी आज राहुल गांधी या विषयासंदर्भात...
Read More
post-image
क्रीडा

भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार – श्रीजेश

जकार्ता – आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले. स्पर्धेपूर्वी आज...
Read More