राष्ट्रीय स्पर्धेत सायना सलग दुसर्‍या वर्षी विजेती – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

राष्ट्रीय स्पर्धेत सायना सलग दुसर्‍या वर्षी विजेती

गुवाहाटी – सायना नेहवालने सलग दुसर्‍या वर्षी वरिष्ठ गटाच्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद मिळवताना पी. व्ही. सिंधूचा सरळ 2 गेममध्ये पराभव करून आपला या स्पर्धेतील जेतेपदाचा शानदार चौकार मारला. गेल्या वर्षी झालेल्या या स्पर्धेत देखील सायनाने सिंधूला पराभूत केले होते. त्याच विजयाची पुन्हा पुनरावृती सायनाने केली. त्यामुळे गेल्या मागील पराभवाचा बदला सिंधूला यंदा देखील घेता आला नाही. दोन स्टार खेळाडूंमधील ही लढत अपेक्षाप्रमाणेच चांगलीच रंगली. पण मोक्याच्या क्षणी सायनाने आपला खेळ उंचावून अखेर निर्णायक लढतीत बाजी मारली.

या स्पर्धेत दुसरे मानांकन देण्यात आलेल्या सायानाने निर्णायक लढत 21-18, 2-15 अशी जिंकली. ऑलिम्पिक स्पर्धेत सिंधूने रौप्यपदकांची तर राष्ट्रकुल स्पर्धेत सायनाने सुवर्णपदकांची कमाई केली. होती. या अगोदर सायनाने 2007, 2008 आणि 2017 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. गेल्या वेळी नागपूर येथे झालेल्या या स्पर्धेत सायनाने पहिल्यांदाच सिंधूला नमवून विजेतेपद पटकावले होते. सौरव वर्माने लक्ष्यसेनचा पराभव करून सलग तिसर्‍यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. त्याने लक्ष्यला सरळ दोन गेममध्ये नमवले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुजार्‍यांना मंदिराच्या ट्रस्टी बनण्यापासून रोखता येणार नाही! हायकोर्टाचा निर्णय

मुंबई – राज्यातील मंदिरातील पुजारी तसेच अन्य काम करणार्‍या व्यक्तींची सेवा ही मंदिराच्या विरोधात नाही. त्यामुळे त्यांना मंदिराच्या विश्वस्त पदी नियुक्त करण्यापासून रोखता येणार...
Read More
post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More