राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राला उपविजेतेपद – eNavakal
क्रीडा महाराष्ट्र

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राला उपविजेतेपद

पुणे – तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३४ व्या स्पारिंग व ८ व्या पुमसे राष्ट्रीय सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत यजमान महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाडूचे प्रदर्शन करून १०९ गुणांसह उपविजेतेपद पटकावले. झारखंडच्या संघाने ११९ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. मणिपूरचा संघ ९९ गुणांसह तिसर्‍या स्थानावर राहिला.

खराडी येथील राजाराम भिकू पठारे स्टेडियम ही स्पर्धा झाली. तब्बल ९ वषार्नंतर ही स्पर्धा महाराष्ट्रात झाली. या स्पर्धेत देशभरातील ३५ राज्यांतून १४५० खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते झाले. या वेळी रामपुरी गोस्वामी, उद्योजक आबा झोडगे, आयोजन समिती चेअरमन संदीप ओंबासे, आयोजन समिती अध्यक्ष सुरेश चौधरी, डॉ. प्रसाद कुलकर्णी, समाजसेवक अजय पांडे, पद्माकर कांबळे, परवेझ खान, तुषार आवटी, दिनेश शिर्के, गफ्फार पठाण, नितीन गुंडा आदी मान्यवर उपस्थितीत होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ न्यायालय महाराष्ट्र

‘माझ्या जीवाला धोका’! अजामिनपात्र वॉरंटविरोधात मेहुल चोक्सी हायकोर्टात

मुंबई- पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या 12 हजार 700 कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आरोप असलेले हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी न्यायालयाने जारी केलेल्या...
Read More
post-image
महाराष्ट्र शेती

पावसाने दडी मारल्याने भातशेती संकटांत

वाडा – पालघर जिल्ह्यात पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने व कडक उन्हामुळे भातशेती संकटांत आली आहे.भात तयार होण्याच्या ऐन मोसमात पावसाने दडी मारल्याने शेतकरी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#AsiaCup2018 बांगलादेशची तिसरी विकेट; शाकीब-अल-हसन बाद

दुबई – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील दुसर्‍या टप्प्याला आजपासून प्रारंभ होत असून, सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा भारत, पाकिस्तान, बांगला देश आणि आफगाणिस्तान यांच्यात लढती...
Read More
post-image
महाराष्ट्र

दडी मारलेल्या पावसाची राजापूरमध्ये दमदार हजेरी

रत्नागिरी – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारलेली आहे. काही तुरळक सरींचा अपवाद वगळता पावसाने तशी पाठच फिरवली होती. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. पण...
Read More
post-image
महाराष्ट्र

नदीतील तरंगता कचरा काढण्यासाठी ‘फ्लोटर वॉटर ड्रोन’चा वापर

पिंपरी – शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदीपात्रातील तरंगता कचरा स्वच्छ करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘फ्लाटिंग वॉटर ड्रोन’ची मदत घेतली आहे. गणेशोत्सवात प्रायोगित तत्त्वावर पवना...
Read More