राष्ट्रवादीच्या संजय ओगले यांची राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी निवड – eNavakal
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या संजय ओगले यांची राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी निवड

रत्नागिरी – राजापूर अर्बन को.आँप.बँक लि. राजापूरच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय ओगले, तर उपाध्यक्षपदी भाजपचे अनिलकुमार करंगुटकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. बँकेवर काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनलची एकहाती सत्ता असल्याने या दोघांचीही बिनविरोध निवड झाली.

सहकार पॅनलने निश्चित केलेल्या धोरणाप्रमाणे अध्यक्ष इब्राहिम बलबले आणि उपाध्यक्ष विजय पाध्ये यांनी आपली एक वर्षाची मुदत संपल्याने आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक झाली, पण ही निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्षपदी राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा मतदारसंघातील स्थानिक नेतृत्व मा.अजितजी यशवंतराव यांचे कट्टर समर्थक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राजापूर नगरपरिषदेचे नगरसेवक संजयजी ओगले यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल राजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अजित यशवंतराव मित्र मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

दहा जिल्ह्यातून प्रवास करून ते सहाजण पोहचले गावाला

वर्धा – भारतातील सर्व राज्य आणी जिल्ह्यांच्या सीमा बंद असूनही तब्बल दहा जिल्ह्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून सहा मजूर आपल्या गावी पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईत ५२६ कोरोनाग्रस्त, ३४ जणांचा मृत्यू

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये थैमान घ्यालणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतातही दहशत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशात सध्या 4,281 कोरोनाग्रस्त असून बळींचा आकडा...
Read More
post-image
महाराष्ट्र

सीईटी बरोबर विद्यापीठाच्या परीक्षा होणार – सामंत

मुंबई – राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठे आणि त्यांच्या अखत्यारीतील महाविद्यालयीन परीक्षेसह सीईटी परीक्षा होणारच आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती...
Read More
post-image
देश

तबलिगी जमातच्या संपर्कातील दीड हजार जणांना कोरोना संसर्ग

नवी दिल्ली – देशातील कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 4 हजार 67 इतकी झाली आहे. त्यात तबलिगी जमातच्या संपर्कात आलेल्या दीड हजार जणांचा समावेश आहे....
Read More
post-image
देश

सॅनिटायझरच्या उत्पादन वाढीसाठी उत्तर प्रदेशात 55 कंपन्यांना परवाने

लखनऊ – कोरोनाचे संक्रमण थोपवण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझरचे उत्पादन वाढावे यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 55 कंपन्यांना नवीन परवाने दिले आहेत. या कंपन्या रोज जवळपास 70...
Read More