राष्ट्रवादीच्या नगरसेविका गिता मंचरकर यांचा मुलींसह आत्महत्या करण्याचा इशारा – eNavakal
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नगरसेविका गिता मंचरकर यांचा मुलींसह आत्महत्या करण्याचा इशारा

पिंपरी – राजकीय व्देशातून माझे पती अँड. सुशिल मंचरकर यांना खोट्या प्रकरणात अडकवले जात आहे. 2014 पासून वारंवार त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. आता पुन्हा महिलेवर गोळीबार केल्याप्रकरणी त्यांना या प्रकरणात गोवले जात आहे. वारंवार होणार्या या प्रकारामुळे आमची सहनशिलता संपली आहे. जर याबाबतीत काही निर्णय घेतला गेला नाही तर, मी माझ्या दोन मुलींसह आत्महत्या करेल असा इशारा राष्ट्रवादीच्या नगरसेविका गिता मंचरकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
अँड. सुशील मंचरकर हे राष्ट्रवादीच्या नगरसेविका गीता मंचरकर यांचे पती आहेत. तुरूंगातील आरोपी पळवून लावणे, कामगार नेते कैलास कदम यांच्या हत्येचा कट रचणे, असे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये त्यांना मोक्का लावण्यात आला आहे. तसेच गेल्या आठवड्यात पिंपरीत एका महिलेवर गोळीबार झाला होता. त्या महिलेने 2014 मध्ये मंचरकर यांच्या विरोधात विनयभंगाची फिर्याद दिली होती. त्या गोळीबारप्रकरणी खूनी हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात मंचरकर यांना अटक करण्यात आली आहे.
सुशिल मंचरकर यांना वारंवार खोट्या गुन्ह्यात अडकवले जात असल्याचे सांगत नगरसेविका गिता मंचरकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी माजी नगरसेवक कैलास कदम यांच्यावर आरोप केलेत. कदम हे राजकीय व्देषापोटी माझ्या पतींना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच मला व माझ्या कुटुुंबियांच्या जीवाला कदम यांच्यापासून धोका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
याप्रकरणी कैलास कदम यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. कदम म्हणाले की, मंचरकर यांनी माझ्यावर केले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. पहिल्यापासून त्यांच्याकडून असे खोटे आरोप माझ्यावर केले जात आहेत. त्यांच्यावर काय गुन्हे दाखल होतात त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही. उलट मंचरकर यांनीच माझी सुपारी दिली असल्याचे पोलीसांनीच उघड केले होते. त्यांच्याकडूनच माझ्या जीवास धोका आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी – महादेव जानकर

नांदेड – उत्पन्न वाढीसाठी शेतीसह जोड व्यवसाय केल्यास शेतकऱ्यांसह तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होईल. यासाठी राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन,...
Read More
post-image
महाराष्ट्र

दुष्काळाबाबत लवकरच जीआर काढणार – मुख्यमंत्री

मुंबई – ३१ ऑक्टोबरनंतर राज्यातील तब्बल 179 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी जाहीर केले. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
क्रीडा

ही आहे धोनीची नवी स्टाईल

नवी दिल्ली – भारत विरुध्द वेस्टइंडीज यांच्यातील पहिला सामना रविवारी खेळण्यात आला, त्यादरम्यान टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याने स्वत:चे काही फोटो सोशल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

फेरीवाला धोरणाची काटेकोर अमंलबजावणी करा – राज ठाकरे

मुंबई – मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून  फेरीवाला धोरणाची आणि त्यातल्या नियमाची काटेकोर अमंलबजावणी करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्र...
Read More
post-image
लेख

अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

आज प्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेत्री आणि नृत्यांगना अश्विनी एकबोटे यांची पुण्यतिथी. त्यांचा जन्म २२ मार्च १९७२ साली झाला. अश्विनी एकबोटे माहेरच्या अश्विनी काटकर, त्यांनी बालपणी नंदनवन...
Read More