राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक डब्बू आसवानी यांच्यावर जीवघेणा हल्ला – eNavakal
गुरुवार विशेष महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक डब्बू आसवानी यांच्यावर जीवघेणा हल्ला

पिंपरी – पिंपरी कॅम्पातले राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक डब्बू आसवानी यांच्यावर काल रात्री जीवघेणा हल्ला झाला आहे. पिस्तुलाचा धाक दाखवत कोयत्याने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर सात जण फरार आहेत. हा प्रकार मध्यरात्री नगरसेवक डब्बू आसवानी यांच्या नातेवाईकांच्या हॉटेलवर घडला. दरम्यान, पिंपरी पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सनी सौदाई याचा काल वाढदिवस होता. हॉटेल सलोनी येथे सनीसह त्याचा भाऊ सचिन सौदाई, सुनील शर्मा, अजय टाक, तुषार दुलेकर, गोलू आणि इतर सात जण आले होते. हे हॉटेलमध्ये उधारीवर दारु मागत होते. यासंबंधी हॉटेल मालक आणि नातेवाईक राकेश यांनी नगरसेवक डब्बू आसवानी यांना फोन करून माहिती दिली. ते तातडीने हॉटेलवर मुलासह पोहचले, तेव्हा डब्बू आसवानी यांनी अगोदर पैसे द्या आणि वस्तू घ्या असे म्हटले. मात्र, सनीसोबत असलेल्या अजय टाकने सनी भाईचा वाढदिवस असल्याने पैसे देणार नाही, असे उत्तर दिले. दरम्यान, आसवानी यांचा मुलगा अमित यालाही त्यांनी शिवीगाळ केली. त्यावर भाषा नीट वापरा, असे अमितने म्हणताच त्याच्या डोक्यात आरोपीने पाण्याच्या जगने प्रहार केला.

मुलाला मारताच नगरसेवक यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आसवानी आणि अमितला आरोपीने दारुच्या बाटल्या फेकून मारल्या. त्याचवेळी सचिन सौदाईसह ४ ते ५ जणांनी हॉटेलच्या बाहेर लोखंडी कोयता आणि लाकडी दांडके घेऊन उभे होते. त्यामधील एकाने तुझी विकेट टाकतो म्हणत आसवानींच्या डोक्याला पिस्तूल लावले.

त्यानंतर त्यांच्यात झटापट झाली आणि पिस्तूल आसवानी यांच्या मागील बाजूस लागले. तेवढ्यात एकाने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आसवानींनी आरडाओरडा केल्याने सर्व आरोपी पळून गेले. याप्रकरणी तिघांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे. इतर सात जणांचा शोध पोलीस घेत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

कॅप्टन ‘कूल’ला डीजे ब्रावोच्या म्यूजिकल शुभेच्छा! ‘Helicopter 7’ गाणं रिलीज

मुंबई – भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याचा आज ३९वा वाढदिवस आहे. त्याचे जगभरातील करोडो चाहते दरवर्षी ७ जुलैची मोठ्या आतुरतेने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

आज मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी

नवी दिल्ली – मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही, याचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत 1,201, पुण्यात 1,245 नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 11 हजार 987वर

मुंबई – महाराष्ट्रात काल दिवसभरात 5 हजार 368 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 11 हजार 987वर पोहोचला आहे....
Read More
post-image
ट्रेंडिंग तंत्रज्ञान

पहिल्या स्वदेशी सोशल मीडिया अॅपला एका दिवसात १० लाख युजर्सने केले डाऊनलोड

नवी दिल्ली – चिनी अॅपवर बंदी आणल्यामुळे भारतात अॅप डेव्हलोपिंगला वेग आला आहे. त्यातच रविवारी पहिल्या स्वदेशीElyments /e सोशल मीडिया अॅपचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू...
Read More
post-image
देश

पीएम केअर फंडात घोटाळा, प्रती व्हेंटिलेटर्ससाठी अडीच लाख रुपये जास्तीचे का दिले, काँग्रेसचा आरोप

नवी दिल्ली – दीड लाखांच्या व्हेंटीलेटर्ससाठी सरकारने अडीच लाख रुपये जास्तीचे का दिले असा खडा सवाल काँग्रेसने केंद्र सरकारला विचारला आहे. पीएम केअर फंडातून...
Read More