राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ट्रोल – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ट्रोल

मुंबई – महाराष्ट्रातील भाजपा-शिवसेना सरकारने वर्ग 2 चे किल्ले लग्नकार्य हॉटेल व रिसॉर्टसाठी देण्याची तयारी केल्यावर राष्ट्रवादीचे खासदार आणि शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली होती. मात्र ‘मराठी टायगर्स’ चित्रपटातील ‘हुरहुर लागे श्‍वासांना’ हे गाणे कोल्हे यांनी पन्हाळा गडावर चित्रीत केल्याने आता अमोल कोल्हे हे टीकेचे लक्ष्य झाले आहेत.

नेटिझन्सने डॉ. अमोल कोल्हे यांच्यासमोर अनेक प्रश्‍न उपस्थित करून त्यांना ट्रोल केले आहे. गडकिल्ल्यांवर लग्न कार्य नको. मग 4 वर्षांपूर्वी हुरहुर लागे श्‍वासांना या रोमँटिक गाण्याचे चित्रिकरण कसे केले? अशी प्रश्‍नांची सरबत्ती कोल्हे यांच्यावर होत आहे.

अर्थात अमोल कोल्हे 4 वर्षांपूर्वी दुसर्‍याच एका सत्ताधारी पक्षात होते. त्यावेळी त्यांनी या पवित्र गडकिल्ल्यावर या रोमँटिक गाण्याचे चित्रिकरण केले. कोल्हे यांना आता गडकिल्ल्यांबद्दल आलेला पुळका किती वरवरचा आणि केवळ पक्षीय राजकारणातून आला आहे. असा आरोप नेटीझन्सने केला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या देश

बँक कर्मचार्‍यांचा दोन दिवसांचा संप मागे

मुंबई – बँक कर्मचार्‍यांनी 26 आणि 27 सप्टेंबर रोजी पुकारलेला संप अखेर मागे घेण्याची घोषणा केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारने त्यांच्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मेकअप बॉक्स वाटल्याप्रकरणी प्रणिती शिंदेेंच्या अडचणीत वाढ

सोलापूर – सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मतदारांना आकर्षित करण्यासाठी कॉँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतरही मेकअप बॉक्सचे वाटप केले असल्याचा आरोप...
Read More
post-image
News देश

शिमल्यात सफरचंदाहून महाग झाला कांदा

देहरादून – हिमालयवासीयांना देखील कांद्याने यावर्षी रडविले आहे. हिलस्टेशन शिमल्यामध्ये कांदा सफरचंदाहून महाग झाला आहे. पंधरा दिवसांपासून कांद्याच्या भावात लाक्षणीय वाढ झाली आहे. 40...
Read More
post-image
News महाराष्ट्र

एमआयएमचे दरवाजे बंद आहेत! पुण्यात प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

पुणे – विधानसभा निवडणुकीकरिता युती करण्यासाठी एमआयएमकडून दरवाजे बंद आहेत. मात्र, वंचित आघाडी एकत्र येण्यास तयार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर...
Read More
post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More