राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ महिला नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र

राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ महिला नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या देशभरातील ४४ माहिलांना ‘नारीशक्ती’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या महिलांमध्ये ६ महाराष्ट्रातील महिलांचाही समावेश आहे. ‘सीडमदर’ राहीबाई पोपरे, कथ्थक नृत्यांगना सीमा मेहता, उद्योजिका कल्पना सरोज, कमांडो प्रशिक्षक सीमा राव, ‘तंतुवी’ संस्थेच्या स्मृती मोरारका, मानदेशी महिला बँकेच्या चेतना सिन्हा, सिस्टर शिवानी या महाराष्ट्रातील महिलांना नारीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार सोहळा राजधानी दिल्लीत राज भवनात पार पडला. यावेळी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कृष्णा राज यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More
post-image
देश

सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

मुंबई – आज सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २२ पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर...
Read More
post-image
महाराष्ट्र

साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर दिब्रिटोंच्या निवड, विहिंपकडून विरोध

उस्मानाबाद – 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. याला विश्व हिंदू परिषदेने...
Read More
post-image
देश विदेश

डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी पुन्हा मध्यस्थीची तयारी दाखवली

न्यूयॉर्क – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नी भारत आणि पाकिस्तानात मध्यस्थी करण्याची तयारी दाखविली आहे. जर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही...
Read More