राष्ट्रकुल स्पर्धेसाठी माजी कर्णधार सरदार सिंहला डावलले – eNavakal
क्रीडा देश

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी माजी कर्णधार सरदार सिंहला डावलले

नवी दिल्ली- आगामी ऑस्ट्रेलियात होणार्‍या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय हॉकी महासंघाने जाहीर केलेल्या पुरुषांच्या हॉकी संघातून भारताचा माजी कर्णधार सरदार सिंह, आघाडी फळीतील रमणदीप सिंह या दोघांना डावलले आहे. मनप्रीत सिंहकडे भारताचे नेतृत्व देण्यात आले आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बुजुर्ग गोलरक्षक पी. आर. श्रीजेशचे संघात कमबॅक झाले आहे. चिंगलेनसना सिंह भारतीय संघाचा उपकर्णधार असेल, 2017 च्या एशिया चषक स्पर्धेत मनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने सुवर्णपदक जिंकले होते. तर भुवनेश्वर येथे झालेल्या वर्ल्ड हॉकी लीग फायनल स्पर्धेत त्यांच्याच नेतृत्त्वखाली भारताने कास्यपदक पटकावले होते. 4 ते 14 एप्रिल दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. श्रीजेशबरोबरच सुरज करकेरा याची दुसरा गोलरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. भारताने आपल्या 18 खेळाडूंच्या चमूत 6 बचावपटूंना संधी दिली आहे. गेल्या 2 स्पर्धात भारताला या स्पर्धेत पदकाने हुलकावणी दिली आहे. या स्पर्धेसाठी भारताचा ‘ब’ गटात समावेश करण्यात आला आहे. भारताच्या गटात पाकिस्तान, मलेशिया, वेल्स, इंग्लंड यांच्या समावेश आहे.

भारतीय हॉकी संघ
मनप्रीत सिंह (कर्णधार), पी. आर. श्रीजेश, सुरज, करकेरा, रुपींदर पाल सिंह, हरमनप्रीत सिंह, वरुण कुमार, कोथाजीत सिंह, गुरींदर सिंह, अमीत रोहिदास, सुमित, विवेक सागर प्रसाद, चिंगलेनसना सिंह, आकाश दीप सिंह, एस. बी. सुनिल, गुरजंत सिंह, मनदीप सिंह, ललीत कुमार उपाध्याय, दिलप्रीत सिंह

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या व्हिडीओ

(व्हिडीओ) सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (१२-१०-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (१७-१०-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस...
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-०३-२०१९)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (०१-०६-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०७-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण : सर्व आरोपींची मुक्तता

नवी दिल्ली – 12 वर्षांपूर्वी झालेल्या समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटप्रकरणी मुख्य आरोपी असीमानंदसह सर्व आरोपींची मुक्तता करण्याचा निर्णय पंचकुलामधील विशेष एनआयएच्या न्यायालयाने दिला आहे. या सुनावणीत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

टीव्हीवर ‘हे’ भाषण ऐकण्यासाठी पवारांनी बैठक थांबवली

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान टीव्हीवर एक भाषण लागलं आणि पवारांनी चक्क...
Read More