राष्ट्रकुल स्पर्धेत विविध क्रिडा प्रकारांना आजपासून होणार सुरुवात – eNavakal
क्रीडा विदेश

राष्ट्रकुल स्पर्धेत विविध क्रिडा प्रकारांना आजपासून होणार सुरुवात

गोल्ड कोस्ट – ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे आजपासून  राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत आज विविध क्रिडा प्रकारांना आज पासून सुरुवात होत असून राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन करणारे गोल्ड कोस्ट हे ऑस्ट्रेलियातील आत्ता पर्यंतचे पाचवे शहर आहे. २०११ मध्ये या शहराला यजमानपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. या स्पर्धेसाठी शुभंकर म्हणून ऑस्ट्रेलियातील एक प्राणी कोआला याची निवड करण्यात आली आहे. त्याचे ‘बोरोबी’ असे नामकरण करण्यात आले आहे. राष्ट्रकुलमध्ये समाविष्ट असणारे बहुतेक देश या स्पर्धेत सहभागी होतील. याचवर्षी ऑगस्टमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सराव म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाईल.

येत्या 15 एप्रिलपर्यंत चालणार्‍या या स्पर्धेत 71 देशांचे 6600 पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होत आहे. 18 विविध खेळांच्या स्पर्धा या मध्ये होणार आहेत. त्याशिवाय 7 अपंगाच्या स्पर्धादेखील होणार आहेत. 1930 पासून या स्पर्धांना प्रारंभ झाला. ऑस्ट्रेलियात पाचव्यांदा ही स्पर्धा होत आहे. एकूण 275 सुवर्णपदाकांसाठी खेळाडूंमध्ये ती मिळवण्यासाठी चुरस असेल. आतापर्यंत झालेल्या या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, भारत या देशांचे वर्चस्व राहिले आहेत.

ह्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर काल फटाक्यांची आतषबाजी आणि नयनरम्य रोषणाईने स्टेडियमचा सर्व भाग उजळून निघाला होता. प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन अभिनेता जॅक थॉमसन्स यांनी सर्वांचे सुरुवातीला स्वागत केले. त्यानंतर मनोरंजनाचा कार्यक्रम रंगला. ऑस्ट्रेलियाचा नामवंत हॉकीपटू मार्क नोल्सने त्यांच्या पथकाचे नेतृत्व केले.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग

क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना! 

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी राहून आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सध्या कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पोषक आहार, व्यायाम आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

इस्राईलचे आरोग्य मंत्री व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

जेरुसलेम – कोरोनाची लागण झालेल्या बड्या लोकांच्या यादीत आता इस्राईलचे आरोग्य मंत्री यांचं देखील नाव सामील झालं आहे. इस्राईलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या...
Read More
post-image
ट्रेंडिंग

घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं?

जगावर कोरोनाचे संकट असल्याने आणि देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला मनसोक्त घराबाहेर पडत येत नाही. अर्थात हे आपल्या काळजीसाठीच असलं तरी घरात राहून कंटाळा...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण

लॉकडाउन संपून कधी एकदाचं घराबाहेर हिंडायला जातो, असं सध्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण काय आहे कि, लॉकडाउन असल्याने त्याचे नियम तर पाळावेच लागणार....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण

मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत....
Read More