मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून मंगलप्रभात लोढा यांची मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या अडीच महिन्यांवर आल्या असताना राज्यातील नेतृत्त्वात झालेल्या या बदलामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर रावसाहेब दानवे यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. तेव्हापासूनच ते प्रदेशाध्यक्षपद सोडतील या चर्चेसह प्रदेशाध्यक्ष पदासाठी विनोद तावडे आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू होती. दरम्यान, गेल्या पाच वर्षांत रावसाहेब दानवे हे त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वारंवार अडचणीत आले. शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली होती.
Bharatiya Janata Party (BJP) Maharashtra President, Raosaheb Patil Danve resigns from his post. (file pic) pic.twitter.com/O02r27mZrF
— ANI (@ANI) July 16, 2019