रावसाहेब दानवेंकडून भाषणात झाली मोठी चूक – eNavakal
News राजकीय

रावसाहेब दानवेंकडून भाषणात झाली मोठी चूक

ठाणे – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष  रावसाहेब दानवे यांनी आज कार्यकर्त्यांशी बोलताना मोठी चूक केली. भाषणातून ते एकदा नाही तर अनेकदा चुकले. वनगांऐवजी विष्णू सावरांचे निधन झाले असे दानवे म्हणाले. रावसाहेब दानवे हे भाजपचे नेते आहेत. ते मंगळवारी पालघर येथील जाहीर सभेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी खासदार चिंतामण वनगा यांच्याऐवजी स्थानिक आमदार विष्णू सावरा यांचे निधन झाल्याचा उल्लेख केला. विशेष म्हणजे बराचवेळ दानवे यांना आपली चूक लक्षात आली नाही. त्यांनी आपले भाषण पुढे तसेच सुरू ठेवले. त्यानंतर पुन्हा एकदा दानवेंनी सावरा कुटुंबीय तिकडे गेले म्हणून भाजपाचे नुकसान होणार नाही, असे म्हटले. यावेळी त्यांना आपली चूक लक्षात आली. त्यानंतर दानवेंनी व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तींकडे बघून काहीतरी थातूरमातूर स्पष्टीकरण दिले. हा सारा प्रकार उपस्थित लोक आणि प्रसारमाध्यमांच्या लक्षात आला. त्यामुळे रावसाहबे दानवे आणि भाजपाची चांगलीच शोभा झाली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More