राम मंदिर बनवण्याच्या कामात मोदी मोठा अडथळा – प्रवीण तोगडिया – eNavakal
Uncategoriz

राम मंदिर बनवण्याच्या कामात मोदी मोठा अडथळा – प्रवीण तोगडिया

नागपूर –  राम मंदिरासाठी जागृकतेची गरज नसून मोदी जागृकतेची गरज असल्याची टीका आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रमुख प्रविण तोगडीया यांनी केली आहे. तसेच  राम मंदिर बनवण्याच्या कामात सर्वात मोठा अडथळा हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा असल्याचा आरोपही तोगडिया यांनी केला आहे.

राम मंदिराच्या निर्माण कार्यात मोदीच मोठा अडथळा ठरत असल्याचे वक्तव्य तोगडिया यांनी केले आहे. मोदींना रामाचे फकीर बनवून पाठवले, पण ते मुस्लिमांचे वकील बनले असल्याचा आरोपही तोगडीया यांनी यावेळी केला आहे.  गेल्या ३२ वर्षांपासून आम्ही राम मंदिराबाबत संसदेत कायदा तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र, त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. मोदींनी आमचा विश्वासघात केला असल्याचेही तोगडीया म्हणाले.

सत्तेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका महत्त्वाची असूनही राम मंदिराबाबत निर्णय होत नाही. संघानी राम मंदीराबाबत कायदा तयार करण्याचे आदेश देणे गरजेचे असल्याचेही तोगडीया म्हणाले. तसेच आम्ही लखनऊवरुन २१ ऑक्टोबरला अयोध्येकडे कूच करणार आहोत. यामध्ये देशातील वेगवेगळ्या भागातून रामभक्त येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

मंदिरांच्या परंपरांमध्ये हस्तक्षेप नको – रजनीकांत

चेन्नई – केरळच्या शबरीमला मंदिरात महिलांना अद्यापही प्रवेश मिळाला नाही. १७ ऑक्टोबरला मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. मात्र महिलांच्या प्रवेशाला मज्जाव करण्यात आला....
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दहशतवाद्यांच्या गडामध्ये भाजपाचा मोठा विजय

श्रीनगर – दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा गड मानल्या जाणार्‍या शोपिया, कुलगाम, पुलवामा आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये भाजपाने नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळविला आहे. 20 पैकी 4...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणी टंचाईवरून सत्ताधारी नगरसेवकांचा महापालिकेवर मोर्चा

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सत्ताधारी भाजप विरोधात विरोधक आक्रमक झाले असताना स्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेवर पाण्याच्या निषेधार्थ मोर्चा काढत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय

कर्नल पुरोहितांची ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल पुरोहित यांनी दाखल केलेली याचिका आज विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात यूएपीए कायद्याअंतर्गत...
Read More