राम मंदिराला विरोध केल्यास दोन्ही सरकार पाडू – खा. स्वामी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

राम मंदिराला विरोध केल्यास दोन्ही सरकार पाडू – खा. स्वामी

नवी दिल्ली – अयोध्येतील राम मंदिरावर नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुनावणी होणार आहे. त्यावेळी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने राम मंदिर उभारणी करण्यास विरोध केल्यास दोन्ही सरकार पाडू, असा इशारा भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एका कार्यक्रमात सुब्रमण्यम स्वामी बोलत होते. राम मंदिर उभारणीचे प्रकरण जानेवारी महिन्यात सुनावणीसाठी येणार आहे. आम्ही दोन आठवड्यात जिंकू. केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार हे दोन्ही पक्षकार आमचे विरोधक आहेत. मला विरोध करण्याची त्यांची हिंमत आहे का? जर त्यांनी मला विरोध केला तर मी सरकार पाडेन. मात्र ते मला विरोध करणार नाहीत हे मला माहीत आहे, असे स्वामी म्हणाले.

दरम्यान, अयोध्येत राम मंदिर उभारण्यास मुसलमानांचा विरोध नसल्याचा दावाही त्यांनी केला. काही मुस्लिमांशी मी व्यक्तीगत भेट घेतली तेव्हा त्यांनी lराम मंदिर उभारणीस विरोध नसल्याचं स्पष्ट केल्याचेही ते म्हणाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या संपादकीय

(संपादकीय) पत्रकारांना गुलाम समजण्याचा नेत्यांनी माज करू नये – जयश्री खाडिलकर-पांडे

बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या समन्वय बैठकीची माहिती पत्रकारांना कळू नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जो खालच्या पातळीचा हीन प्रकार केला त्याचा ‘नवाकाळ’...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

‘चौकीदार चोर है’ प्रकरणी राहुल गांधींचा माफीनामा सुप्रीम कोर्टाकडून मंजूर

नवी दिल्ली – ‘चौकीदार चोर है’ प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा माफीनामा मंजूर करण्यात आला आहे. तसेच राहुल गांधी यांनी भविष्यात कोणतीही टिप्पणी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राफेलच्या पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने राफेल कराराबाबत दाखल झालेल्या पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

सबरीमाला मंदिर प्रवेशाचा निर्णय सात न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार

नवी दिल्ली – नवी दिल्ली – ऐतिहासिक सबरीमाला प्रकरणावरील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात ३ विरुद्ध २ च्या बहुमताने सात न्यायमूर्तींच्या संविधान पीठाकडे पाठविण्यात आली आहे....
Read More
post-image
विदेश

व्हेनिसला महापुराचा तडाखा; पर्यटकांचे हाल

वेनिस – जगातील सुंदर शहर अशी ओळख असलेल्या व्हेनिस शहराला महापुराने विळखा घातला आहे. इटलीतील या शहराचे महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. येथील जनजीवन...
Read More