‘रामायण एक्सप्रेस’ सुरु होणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

‘रामायण एक्सप्रेस’ सुरु होणार

नवी दिल्ली – रामायणात उल्लेख असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी धार्मिक पर्यटनाची रामायण एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला आहे. १४ नोव्हेंबरला रामायण एक्स्प्रेसचा प्रवास दिल्ली येथून सुरू होणार आहे. मनोज सिन्हा, रेल्वे राज्यमंत्री म्हणाले की, प्रभू रामाच्या तीर्थस्थळांना भक्त आणि पर्यटक सतत भेट देतात. या सर्व ठिकाणी जाणारी रामायण एक्सप्रेस सुरु केली जाणार आहे. या ट्रेनच्या मागचा अभ्यास सुरु आहे.

केंद्रातील भाजपा सरकारचा हा निर्णय निवडणुकीवर डोळा ठेवून घेतला असल्याची टीका होत आहे. दुसरीकडे मुस्लीम संघटनांनी मागणी केली आहे की, आमच्या धार्मिक स्थळांना जोडणारी रेल्वेही सरकारने सुरु करावी.

कसा असेल ‘रामायण एक्सप्रेस’चा प्रवास 

अयोध्या ते कोलंबो असा १६ दिवसांचा प्रवास असून भक्तांना रामेश्वरमपर्यंत रेल्वेने जाता येणार आहे. पुढचा प्रवास मात्र त्यांना विमानाने करावा लागणार आहे. १४ नोव्हेंबरला रामायण एक्स्प्रेसचा प्रवास दिल्ली येथून सुरू होणार आहे. दिल्ली येथील सफदरगंज स्थानकावरून प्रारंभ होईल. अयोध्या, नंदीग्राम, सितामढी, जनकपूर, वाराणसी, प्रयाग, चित्रकुट, नासिक, हंपी आदी ठिकाणांना भेट देईल. कोलंबोला जाण्यासाठी विमानासाठी अतिरिक्त रक्कम द्यावी लागणार आहे. आयआरसीटीसीने यासाठी १५,१२० रुपयांचे दर आकारले असून यात प्रवासासह, राहण्याची व जेवण्याची सोय केली आहे. शिवाय गाईडची सोय आहे. एकावेळी ८०० प्रवासी या रेल्वेतून प्रवास करू शकतील. आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून या रेल्वेसाठी नाव नोंदवता येते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

विराटला कोणतीच ताकीद दिली नाही – बीसीसीआय

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला माध्यमे आणि चाहत्यांशी नम्रतेने वाग अशी ताकीद बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने दिली असे वृत्त काही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

सई आणि ‘तो’

मुंबई – मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरच्या एका फोटोची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सईने एका तरुणासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. सईनं या फोटोकॅप्शनमध्ये पिवळ्या हार्ट...
Read More
post-image
महाराष्ट्र

अकोले तालुक्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या

अकोले – अकोले शहरातील उपनगरातील गजबजलेल्या परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एकाच वेळी सहा ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून घरफोड्या केल्या. या सहा ठिकाणी...
Read More
post-image
देश

गडचिरोलीत दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील धानोरी तालुक्यात दोन महिला माओवादींना गोळ्या झाडून ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मालेगाव बॉम्बस्फोट : कर्नल पुरोहितांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच

नवी दिल्ली – २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. कर्नल पुरोहित यांनी विशेष न्यायालयाद्वारे बेकायदा...
Read More