‘रामा’पेक्षा ‘नामा’ला दुष्काळ महत्वाचा वाटतो-नाना पाटेकर – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

‘रामा’पेक्षा ‘नामा’ला दुष्काळ महत्वाचा वाटतो-नाना पाटेकर

पुणे – पुण्यातील खडकवासला धरणाचा गाळ बाहेर काढण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहे, नाम संस्था, ग्रीनथंब संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने मनेवाडी भागात गाळ उपसा करून त्यावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे, या उपक्रमाच्या सुरूवातीला नाम फांउडेशनचे संस्थापक नाना पाटेकर आणि मकरंद आनासपूरे यांनी उपस्थिती दर्शवली, त्यावेळी नाम फाउंडेशनच्या वतीने या उपक्रमाला पाच पोकलन देण्यात आले, यावेळी माध्यमांशी बोलताना नाना पाटेकर भाउक झाले. दुष्काळ ग्रस्तांना मदतीची गरज आहे, त्यांना एक पेंडी चारा आणि मूठभर धान्याची तरी मदत करा, अशी विनंती नानांनी केली.

माध्यमांनी नाना पाटेकरांना राम मंदिराबद्दल प्रश्न केला असता, कोणाला काय वाटते, हे ज्याच्या त्याच्या मनावर आहे. ज्यांना राम मंदिर बांधायचे आहे त्यांनी खूशाल बांधावे,मात्र गरीबांच्या पोटात दोन घास जाणे, हे माझ्यासाठी महत्वाचं असल्याचे नाना पाटेकरांना स्पष्ट केले. देशात निघालेल्या शेतकरी मोर्चांवर बोलताना नानांनी विविध सामाजिक संस्थांना मदतीचे आवाहन केले आहे. देशात शेतकरी मोर्चे निघत आहेत, याचा अर्थ शेतकऱ्यांच्या गरजा अपूर्ण आहेत, काही आपेक्षा आहेत, त्यामुळे मोर्चे निघत आहेत. पण एकटे सरकारही त्यावर काही तोडगा काढू शकत नाही, त्यासाठी विविध सामाजिक संस्थांनी पूढे येणे गरजचे आहे. त्यांनी दुष्काळग्रस्त भागातील गरीबांना मदत करावी, असे आवाहन नाना पाटेकर यांनी केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More