रामदास बोट दुर्घटनेचे साक्षीदार बारक्याशेठ मुकादम काळाच्या पडद्याआड – eNavakal
News महाराष्ट्र

रामदास बोट दुर्घटनेचे साक्षीदार बारक्याशेठ मुकादम काळाच्या पडद्याआड

अलिबाग – 1947 मध्ये झालेल्या रामदास बोट दुर्घटनेचे अखेरचे साक्षीदार बारक्याशेठ मुकादम यांचे आज सकाळी वयाच्या 91 वर्षी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
देशभरात गाजलेल्या रामदास बोट जलसमाधी दुर्घटनेतून वयाच्या 10 व्या वर्षी समुद्राच्या खळाळत्या लाटांवर स्वार होत किनारा गाठून मोठ्या धाडसाने ते वाचले होते. त्यावेळी ब्रिटीश अधिकार्‍यांनी मुकादम यांच्या धाडसाचे कौतुक केले होते. 15 ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीदिनाच्या केवळ 29 दिवस आधी 17 जुलै 1947 रोजी गटारी अमावास्येच्या दिवशी रामदास बोट दुर्घटनाग्रस्त झाली होती. सकाळी आठ वाजता भाऊचा धक्का (मुंबई) येथून निघून रेवस(अलिबाग) बंदरात तब्बल 700 प्रवाशांना घेवून येणारी रामदास बोट काशाच्या खडकाजवळ वातावरणात अचानक बदल होऊन निर्माण झालेल्या समुद्र लाटांच्या मार्‍याने बुडाली होती. त्या बोटीत असलेल्या 700 प्रवाशांपैकी केवळ 60 प्रवासी वाचू शकले होते. तर तब्बल 640 प्रवाशांचा बुडून मृत्यू झाला होता. याच भीषण परिस्थितीला मोठ्या जिद्दीसह धाडसाने सामोरे जावून त्यावेळी केवळ 10 वर्षाचे असणारे बारक्याशेठ मुकादम चमत्कारिकरीत्या वाचले होते. बारक्याशेट यांनी तब्बल 22 तास खवळलेल्या समुद्रात पोहत किनारा गाठून आपला जीव वाचवला होता. त्यांच्या निधनाने रामदास बोट दुर्घटनेतील अखेरची साक्ष मिटली आहे. आता रामदास बोट दुर्घटनेचा इतिहास कोणीही सांगू शकणार नाही. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना-जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. अलिबाग कोळीवाडयातील मेटपाडा स्मशानभूमीत त्याच्यावर दूपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

एमआयएमकडून मुंबईतील ५ उमेदवारांची यादी जाहीर

औरंगाबाद – एमआयएम पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एमआयएम ‘वंचित’ आघाडीत सहभागी होईल अशी चर्चा होती. मात्र...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई – शिवसेना-भाजपा युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच युती न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More
post-image
देश

सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

मुंबई – आज सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २२ पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर...
Read More