रामदास कदमांनी केली वारकरी विद्यार्थ्यांसमवेत चंद्रभागेची स्वच्छता – eNavakal
महाराष्ट्र

रामदास कदमांनी केली वारकरी विद्यार्थ्यांसमवेत चंद्रभागेची स्वच्छता

पंढरपूर – शिवसेपक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेल्या पवित्र चंद्रभागा महाआरतीच्या पार्श्वभूमीवर विस्तीर्ण असे चंद्रभागेचे वाळवंटात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी स्वतः सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत स्वच्छ केले. त्यांच्या समवेत वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कचरा उचलत होते.

पंढरपुरात चंद्रभागा नदीचे विस्तीर्ण पात्र आहे. परंतु राज्य भरातून दररोज हजारो लोक मोठ्या श्रद्धेने दशक्रिया विधी करण्यासाठी चंद्रभागा किनारी येत असतात विधिपूर्वी व विधिनंतर लोक जुने कपडे, प्लॅस्टिकच्या पिशव्या, शिजवलेले अन्न, पत्रावळ्या, निर्माल्य आदी वस्तू चंद्रभागेच्या पात्रात, वाळवंटात सोडून देत असतात. त्यामुळे पवित्र चंद्रभागेचे पात्र कायमच अस्वच्छ असते. गेले तीन दिवस राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम हे पंढरीत तळ ठोकून आहेत. चंद्रभागेच्या विस्तीर्ण वाळवंटातील ही अस्वच्छता पाहून स्वतः रामदास कदम यांनी आज सकाळी आठ वाजल्यापासून हातात खराटे घेऊन स्वच्छतेला सुरुवात केली. ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांच्या वारकरी शिक्षण संस्थेचे शंभर विद्यार्थी व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.सुमारे 25 टन इतका कचरा उचलून पवित्र चंद्रभागेचे वाळवंट चकाचक केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
ट्रेंडिंग देश

आंतरराष्ट्रीय चहा दिन : सुर्रर्र के पियो!

‘सुर्रर्र के पियो’! हे वाक्य ऐकल्यानंतर अर्थात सर्वात प्रथम डोळ्यासमोर येतो तो गरमागरम चहा.  अनेकांना सकाळी उठल्यावर चहा  घेतल्याशिवाय कामाची तरतरी येत नाही. हल्ली...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघर आजही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले

पालघर – आज सलग तिसऱ्या दिवशी पालघर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात आज पहाटे 5 वाजून २2 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची...
Read More
post-image
देश

१३ दिवसांच्या उपोषणाने स्वाती मालीवालची प्रकृती बिघडली

नवी दिल्ली – बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला अटक केल्यानंतर सहा महिन्यांच्या आत फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या १३ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

उद्धव ठाकरेंचे सर त्यांच्याविषयी सांगतात…

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तम छायाचित्रकार आहेत, ही बाब कमी जणांना माहित आहे. मात्र त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनांच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विराटची टीम इंडिया आज वेस्ट इंडीजला भिडणार

चेन्नई – टी-२० मालिकेपाठोपाठ आजपासून भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला प्रारंभ होत आहे. विराट कोहलीचा भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, बांगलादेश यांच्यापाठोपाठ आता...
Read More