राफेल प्रकरण- चुकीच्या माहितीच्याआधारे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय- खडगे – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

राफेल प्रकरण- चुकीच्या माहितीच्याआधारे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय- खडगे

नवी दिल्ली – राफेल करारावरून सर्वोच्च न्यायलयाने निकाल दिल्यानंतरही विरोधक सरकारवर आरोपांच्या फैं-या झाडत आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर कॅगचा अहवाल म्हणून चुकीचा अहवाल सादर करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि संसदेच्या लोकलेखा समितीचे (PAC) प्रमुख मल्लिकार्जुन खडगे यांनी करत पुन्हा एकदा सरकारला घेरले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाला चुकीची माहिती प्राप्त झाल्यामुळेच न्यायाल्याने हा निर्णय दिल्याचेही खडगे यांनी सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात एका ठिकाणी उल्लेख केला होता की, कॅगने (CAG) आपला अहवाल सादर केला असून पब्लिक अकाऊंट्स कमिटीने (PAC) हा अहवाल तपासला आहे. परंतु पीएसीचे अध्यक्ष असलेले मल्लिकार्जुन खडगे यांनी मोदी सरकारने कॅगच्या रिपोर्टबाबत सर्वोच्च न्यायालयाला चुकीची माहिती दिली असल्याचे म्हंटले आहे. पीएसीसमोर कॅगचा अहवाल सादर झालेला नसल्याचेची खडगे यांनी स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मी पीएससी सदस्यांना आवाहन करेन की अॅटर्नी जनरल, नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांना बोलावून राफेल प्रकरणात कॅगचा अहवाल कधी आणि कुठे आला आहे असा प्रश्न विचारावे. राफेलबाबत न्यायालयासमोर ज्या गोष्टी योग्य पद्धतीने ठेवायला हव्या होत्या, त्या ठेवल्या नाहीत. अॅटर्नी जनरल यांनी अशाप्रकारे सरकारची बाजू मांडली की, न्यायालयाला असंच वाटलं की कॅगचा अहवाल संसदेत सादर झाला असून पीएसीने अहवाल पाहिला आहे. जेव्हा पीएसी तपास करते, तेव्हा पुरावे पाहते. पण न्यायालयाला चुकीची माहिती दिली, त्याच्याच आधारावर हा निर्णय दिला असल्याचे खडगे म्हणाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More
post-image
लेख

परामर्ष : इंग्रजीमुळे राष्ट्रभाषा कुपोषित

हिंदी भाषा दिवसाच्या निमित्ताने देशभरात विशेषतः हिंदी भाषिक राज्यांमध्ये बरेच कार्यक्रम झाले. परंतु अन्य राज्यांमध्ये या राष्ट्रभाषेविषयी हवी तशी आस्था दाखवली गेलेली नाही. किंबहुना...
Read More