राफेल कराराचा तपशील सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश – eNavakal
आघाडीच्या बातम्या न्यायालय

राफेल कराराचा तपशील सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

नवी दिली – सध्या राफेल करारावरून भाजपला आणि विशेषतः मोदी सरकारला घेरले आहे. विरोधी पक्षनेते यावरून भाजपला लक्ष्य करण्याची एकाही संधी सोडत नाही. यातच आता सर्वोच्च न्यायालयाने देखील केंद्र सरकारला फटकारले आहे. भारताने फ्रान्ससोबत केलेल्या राफेल करारावरील निर्णयाचा तपशील सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. करारातील तांत्रिक गोष्टी आणि एकंदर निर्णय प्रक्रियेचा तपशील बंद लिफाफ्यात सादर करण्याचा आदेश दिला आहे.

राफेल विमान भारतासाठी किती फायद्याचे असू शकते यात काहीही शंका नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. त्यामुळे केंद्र सरकारला कोणतीही नोटीस पाठवण्यात आलेली नाही. परंतु या करारासंबंधात पारदर्शकता हवी आणि वैधतेसंदर्भात स्पष्टता द्यावी यासाठी प्रक्रियेची माहिती मागवण्यात यावी असेही सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले.

 

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

‘मोदी हटाओ, योगी लाओ’ लखनऊत पोस्टरबाजी

लखनऊ – तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवानंतर लखनऊमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान बनवा असे पोस्टर झळकले आहेत. उत्तर प्रदेश नवनिर्माण...
Read More
post-image
देश

वेगळा धर्म म्हणून मान्यता जंतरमंतरवर जोरदार आंदोलन

नवी दिल्ली – लिंगायत समाजाला हिंदू धर्मापेक्षा वेगळा व स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्या, या मागणीसाठी आज दिल्लीच्या जंतरमंतरवर लिंगायत समाजाने जोरदार आंदोलन केले....
Read More
post-image
मुंबई

ठाणे विभागात वर्षभरात शिवशाहीचे 26 अपघात

ठाणे- प्रवाशांना वाजवी दरात वातानुकुलित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देण्यासाठी एसटी प्रशासनाने शिवशाही बस आणल्या तरी एसटीच्या ठाणे विभागातील शिवशाही बसचे वर्षभरात 26 अपघात...
Read More
post-image
महाराष्ट्र

सोलापुरात एमआयएमचा मूकमोर्चा आणि धरणे आंदोलन

सोलापूर – गोपालसिंह समिती, सल्पर समिती, रंगनाथ मिश्रा आयोगाने मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या शिफारसी केल्या होत्या. मात्र त्या शिफारशींची अंमलबजावणी झाली नाही. या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी...
Read More