राफेलची संख्या, किंमतीचा संबंध कोर्टाशी नाही-कोर्टाने याचिका फेटाळली – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश महत्वाच्या बातम्या

राफेलची संख्या, किंमतीचा संबंध कोर्टाशी नाही-कोर्टाने याचिका फेटाळली

नवी दिल्ली –  आज सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई, न्या.के.एस.जोसेफ आणि न्या.एस.के. कौल यांच्या खंडपीठाने कागदोपत्री पुरावे नसल्याचे सांगत राफेल लढाऊ विमानाच्या खरेदी व्यवहाराच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या. यामुळे भाजपाचा आनंद उफाळून आला. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय ‘पुराव्याअभावी’ झाला आहे ही बाब अधिक प्रकाशात न आणता भाजपाने लगेच काँग्रेसला धारेवर धरण्यास सुरुवात केली. राहुल गांधींनी केलेले आरोप खोटे होते हे आज सिद्ध झाले, असे गृहमंत्री राजनाथ सिंग लोकसभेत म्हणाले आणि भाजपा खासदारांनी बाके वाजवली. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनीही ताबडतोब पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींवर तोफ डागली. काँग्रेसच भ्रष्ट असून राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.

आज सकाळी 11 वाजता सर्वोच्च न्यायालयाने राफेलबाबत निर्णय दिला. कोर्टाच्या नियंत्रणात राफेल व्यवहाराची चौकशी करण्यासाठी विशेष कृतीदल नियुक्त करावे ही यशवंत सिन्हा व अरुण शौरी यांची याचिका न्यायालयाने फेटाळली. हा निकाल देताना न्यायालयाने म्हटले की, राफेल विमानाची किंमत आणि खरेदी प्रक्रिया तपासणे हे न्यायालयाचे काम नाही. अनिल अंबानी यांना दसॉल्ट कंपनीने उपकंत्राट दिले आहे. त्यामुळे सरकारचा या उपकंत्राटाशी संबंध नाही हा युक्तीवाद आम्ही मान्य करतो आणि चौकशी समितीची मागणी फेटाळतो.

यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणारे अ‍ॅड.प्रशांत भूषण या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, हा निकाल चुकीचा असून आम्ही याविरोधात फेरविचार याचिका दाखल करण्याचा विचार करीत आहोत. न्यायालयाने म्हटले आहे की, हा करार करून कुणाला लाभ मिळवून दिल्याचे आढळत नाही.फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींच्या मुलाखतीवर आधारून चौकशीची मागणी केली जाऊ शकत नाही. अर्जदाराने एकही पुरावा सादर केलेला नाही. यावर अ‍ॅड.प्रशांत भूषण म्हणाले की, हवाई दलाने समितीची बैठक घेऊन 126 विमानांची मागणी केली होती. पंतप्रधान मोदी फ्रान्सला गेले आणि त्यांनी सरळ 126 ऐवजी फक्त 36 विमानांचा करार केला.

हवाई दलाने या विमानांची किंमत ठरवली होती तर पंतप्रधान फ्रान्सला गेले आणि त्यांनी किंमत दुप्पट केली. राफेल विमानाची किंमत हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा करून सरकारने किमतीबाबत गुप्तता राखण्याची विनंती कोर्टाला केल्याने त्यावर चर्चाच झाली नाही. खरेदी प्रक्रियेबाबत सरकारने बंद पाकिटात उत्तर दिले. त्यामुळे त्यावर युक्तीवादच झाला नाही. त्यात काय लिहिले आहे ते अद्याप आम्हाला माहीत नाही. दसॉल्ट कंपनीने डावलून दोन महिन्यांपूर्वी जन्माला आलेल्या अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीला कंत्राट दिले. याचा शोध आवश्यक होता. मात्र दसॉल्ट कंपनीने कुणाला कंत्राट द्यायचे तो कंपनीचा प्रश्न आहे, असे म्हणून न्यायालयाने हाही मुद्दा फेटाळला. या सर्व बाबींची विशेष कृती दलाने चौकशी केलीअसती तर सत्य बाहेर आले असते. पण चौकशी केली नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला. चौकशी न करता पुरावे कुठून मिळणार? हा प्रश्नच आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज अखेर दिवाळखोरीत

नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेज कंपनी अखेर दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्याबाबत एकाही...
Read More