‘राधिका आपटेचा बोल्ड सीन’ अशीच चर्चा का? – eNavakal
मनोरंजन

‘राधिका आपटेचा बोल्ड सीन’ अशीच चर्चा का?

मुंबई – आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना भुरळ घालणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे लवकरच स्लमडॉग मिलिनिअर फेम देव पटेल याच्यासह ‘द वेडिंग गेस्ट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यातील एक बोल्ड सीन लीक झाला असून सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ‘राधिका आपटेचा बोल्ड सीन’ अशी याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु राधिकाने मात्र यावर आक्षेप घेतला आहे. ‘त्या व्हायरल झालेल्या सीनमध्ये माझ्यासोबत देव पटेलही आहे मग ‘राधिका आपटेचे बोल्ड सीन’ अशीच चर्चा का होते?’ असा संतप्त सवाल तिने केला आहे.

एका मुलाखतीत या सीनबाबत बोलताना राधिका म्हणाली, ‘बोल्ड सीन लीक होणे आणि सोशल मीडियावर व्हायरल होणे हे आपल्या समाजाची मानसिकता दर्शवते, असे म्हणत, या चित्रपटात ‘त्या’ सीनपेक्षाही अधिक चांगले सीन आहेत. मग त्या बोल्ड सीनचीच चर्चा का? आणि देवदेखील सीनमध्ये असून माझ्याच नावाची चर्चा का?’ असा प्रश्नही तिने विचारला आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

उद्धव ठाकरेंचे सर त्यांच्याविषयी सांगतात…

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तम छायाचित्रकार आहेत, ही बाब कमी जणांना माहित आहे. मात्र त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनांच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विराटची टीम इंडिया आज वेस्ट इंडीजला भिडणार

चेन्नई – टी-२० मालिकेपाठोपाठ आजपासून भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला प्रारंभ होत आहे. विराट कोहलीचा भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, बांगलादेश यांच्यापाठोपाठ आता...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आज दुपारी १२ वाजता विरोधी पक्षांची बैठक; १ वाजता पत्रकार परिषद

नागपूर – उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती आखण्याबाबत आज विरोधी पक्षांची बैठक पार पडणार आहे. आज दुपारी १२ वाजता रविभवनातील विरोधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अरेरे! उद्यापासून दूध महागणार

पुणे – इंधन आणि कांद्याच्या दरवाढीनंतर आता दूधाच्या किंमतीही वाढणार आहेत. राज्यात गायीचे दूध सोमवारपासून लिटरमागे दोन रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे गायीच्या दुधाच्या एका लिटरसाठी...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

आजपासून चारचाकी वाहनांना महामार्गावर ‘फास्ट टॅग’ सुरू

नवी दिल्‍ली- चारचाकी वाहनाधारकांचा प्रवास वेगवान होण्यासाठी आज रविवारपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ‘फास्ट टॅग’ सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहनांना...
Read More