राधाकृष्ण विखे-पाटलांच्या मंत्रिपदाविरोधात याचिका – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राधाकृष्ण विखे-पाटलांच्या मंत्रिपदाविरोधात याचिका

मुंबई – काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे भाजपने गृहनिर्माण मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यांना दिलेलं मंत्रिपद घटनाविरोधी असल्याचं म्हणत वकील सतीश तळेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. राज्यात कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नसताना राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्रिपद का दिलं? याचं उत्तर सरकारनं द्यावं असं या याचिकेमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, यामुळे राजकीय भ्रष्टाचार बोकाळेल असं देखील सतीश आळेकर यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात राधाकृष्ण विखे-पाटील यांना दिलेल्या मंत्रिपदाबाबत सवाल केले. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी याचं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

राफेलच्या पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने राफेल कराराबाबत दाखल झालेल्या पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

सबरीमाला मंदिर प्रवेशाचा निर्णय सात न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार

नवी दिल्ली – नवी दिल्ली – ऐतिहासिक सबरीमाला प्रकरणावरील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात ३ विरुद्ध २ च्या बहुमताने सात न्यायमूर्तींच्या संविधान पीठाकडे पाठविण्यात आली आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, राजकारण आमच्यासाठी धंदा नाही – संजय राऊत

मुंबई – ‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात शब्दाला किंमत आहे. आमची वृत्ती व्यापारी नाही,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

#HappyChildrensDay दारातून डोकावणारी ‘ती’ आज वर्गात बसून शिकतेय

हैदराबाद – असे म्हणतात की, ‘एक फोटो हा हजारो शब्दांसमान असतो.’ अशीच कमाल हैदराबादमधील एका छायाचित्रकाराने टिपलेल्या फोटोने केली आहे. दाराबाहेर उभी राहून वर्गात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

संजय राऊत म्हणतात…’अब हारना और डरना मना है’

मुंबई – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सत्तास्थापनेच्या हालचाली प्रचंड वेगाने सुरू आहेत. शिवसेनेकडून ‘पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच’, अशी घोषणा...
Read More