राणे समिती आणि आयोगाच्या सर्व्हेक्षणात तफावत! याचिकाकर्त्याचा दावा – eNavakal
News महाराष्ट्र मुंबई

राणे समिती आणि आयोगाच्या सर्व्हेक्षणात तफावत! याचिकाकर्त्याचा दावा

मुंबई – मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍या याचिकाकर्त्यांनी आज पुन्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करणार्‍या राणे कमिटी आणि मागास प्रवर्ग आयोगांच्या सर्व्हेक्षणावर आक्षेप घेतला. राणे कमिटी आणि आयोगाच्या सर्व्हेक्षणात मोठ्या प्रमाणात तफावत आहे. आयोगाने चुकीच्या पद्धतीने आकडेवारी नोंदवत मराठा समाजाला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास ठरवल्याचा दावा आज केला.
आरक्षण कायद्यात नव्याने दुरुस्ती करून 16 टक्के मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या आणि आरक्षणाला समर्थ देणार्‍या याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍या याचिकाकर्ता संजीत शुक्ला यांच्या वतीने अ‍ॅड.प्रदिप संचेती यांनी सुनावणीच्या सातव्या दिवशी आरक्षणाला विरोध केला. मराठा समाजाला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास ठरविताना ग्राह्य धरलेली मुल्यांकन अनाकलनीय असल्याचा दावा केला. मराठा समाजाची राणे समितीने 4 लाख लोकांचा सर्व्हे करून सादर केलेली आकडेवारी आणि मागास प्रवर्गासाठी केवळ 43 हजार व्यक्तींचा सर्व्हेकरून सादर केलेल्या आकडेवारीत तफावत असल्याचे सांगत न्यायालयाचे लक्ष वेधले. आज युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने सुनावणी उद्या 21 फेब्रुवारी रोजी निश्चित केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

येडीयुरप्पा अडचणीत! मंत्री, आमदार नाराज

बंगळुरू – काँग्रेस, जनता दल (सेक्युलर) व अपक्ष आमदारांना फोडून, कुमारस्वामी सरकार पाडून कर्नाटकात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या येडीयुरप्पा सरकारलाच आता आमदारांच्या बंडखोरीचा सामना करावा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

मंगला एक्स्प्रेसचं इंजिन बिघडलं! मध्य रेल्वेचा आजही खोळंबा

ठाणे – सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे खोळंबली असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. टिटवाळा येथे मंगला एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कसाऱ्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

…तर पुन्हा विमा कंपन्यांविरोधात आंदोलन! उद्धव ठाकरेंचा दोन्ही सरकारना इशारा

मुंबई – महाराष्ट्रातील पूरसमस्या ओसरल्यावर शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पीक विमा प्रश्‍नावर पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेने जून महिन्यात शेतकर्‍यांच्या पीक विम्याचे पैसे न...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

संभाजी ब्रिगेडकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

औरंगाबाद – राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यंदा संभाजी ब्रिगेड संघटनाही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी,...
Read More
post-image
देश

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर, कार्यालयांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली – दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या जेट एअरवेजच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने छापेमारी केली आहे. तसेच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश...
Read More