राणीबागेतील ‘त्या’ विस्तारीत प्राणिसंग्रहालयात फुलणार परदेशी प्राण्यांचं नंदनवन – eNavakal
News मुंबई

राणीबागेतील ‘त्या’ विस्तारीत प्राणिसंग्रहालयात फुलणार परदेशी प्राण्यांचं नंदनवन

मुंबई- ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय’ अर्थात राणीबाग परिसरालगतचा मफतलालच्या जागेवरील भूखंड महापालिकेला हस्तांतरीत करण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्यानंतर शुक्रवारी ही जागा अधिकृतपणे ताब्यात घेण्यात आली. गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महापालिकेने या जागेचा प्रत्यक्ष ताबा घेऊन त्याच्या वापराला सुरुवात केली. आता या जागेवर परदेशी प्राण्यांचं नंदनवन फुललं जाणार असून येत्या दोन वर्षांमध्ये या जागेत आफ्रिकन, ऑस्ट्रेलियन तसेच आशियायी प्राण्यांना पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणीचा बाग) आहे. या उद्यानालगत सुमारे 54 हजार 568.72 चौरस मीटर आकाराचा भूखंड आहे. माझगाव विभागातील सीएस 593 क्रमांकाचा हा भूखंड मे. मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड यांना भाडेपट्ट्याने देण्यात आला होता. याबाबत महाराष्ट्र शासनाद्वारे वर्ष 2004 मध्ये काढलेल्या अधिसूचनेआधारे व सदर भाडेपट्ट्याचा कालावधी वर्ष 2017 मध्ये संपल्यानंतर मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांद्वारे या भूखंडाच्या निम्मा अर्थात 27 हजार 284.36 चौरस मीटर एवढ्या आकाराचा भूभाग महापालिकेकडे वर्ग करण्याचे निर्देश ‘मे. मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड’ ला देण्यात आले होते. प्रत्यक्षात ही जागा महापालिकेच्या ताब्यात कागदोपत्री असूनही मफतलालने तो देण्यास नकार दिला होता. त्यावरून पुन्हा न्यायालयात वाद सुरू होता आणि हा निकाल महापालिकेच्याबाजूनं लागला.न्यायालयाच्या आदेशानंतर मागील दोन दिवसांपूर्वी येथील मफतलालमधील रस्ता बंद करून राणीबागेतूनच रस्ता खुला करण्यात आला. शुक्रवारी येथील सुरक्षा रक्षकांची झोपडी तोडून याठिकाणी विस्तारीत प्राणिसंग्रहालय बनवण्याची प्रक्रिया जोरात हाती घेण्यात आली आहे.
अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्‍हाड यांनी शुक्रवारी राणीबागेतील या विस्तारीत प्राणिसंग्रहालयासंदर्भात अधिकार्‍यांशी बैठक घेऊन पुढील प्रक्रिया जलदगतीनं राबवण्याच्या सूचना सर्वांना दिल्या आहेत. या विस्तारीत प्राणिसंग्रहालयाच्या जागेवर आफ्रिकन सवाना, ऑस्ट्रेलियन, साऊथ आफ्रिकन आदी भागातील परदेशी प्राण्यांचे संग्रहालय बनवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्‍हाड यांनी दिली आहे.

सध्या जिराफ, झेब्रा, चिता, हिप्पोपॉटोमस, ऑस्ट्रीच, कांगारु, इमू, जग्वार आदी प्राणी या प्राणिसंग्रहालयात आणले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. परदेशी प्राणि याठिकाणी आणतानाच ते येथील नैसर्गिक वातावरणाशी समरस होतील,असेच प्राणी याठिकाणी आणले जातील,असेही त्यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात

नवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम        

अखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप

मुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...
Read More