मुंबई – बाहुबली या सुपरहिट चित्रपटातील भल्लालदेव म्हणजेच राणा दुगुबुत्ती याला चक्क हॉलीवूडची लॉटरी लागली आहे. राणा लवकरच एका हॉलीवूड चित्रपटात दिसू शकतो अशी माहिती एका वेबसाईट दिलेल्या मुलाखतीतून स्पष्ट झाली आहे. राणाचे व्यक्तिमत्व हे असेही खूपच आकर्षक असून तो तिथेही छाप पाडणार अशी त्याच्या चाहत्यांना खात्री आहे. अद्याप राणाने अधिकृतरीत्या यावर शिक्कामोर्तब केलेले अनही. त्यामुळे आता राणाला हॉलीवूड चित्रपटात पाहण्यास चाहत्यांना उत्सुकता आहे. सध्या राणा हाथी मेरे साथी या चित्रपटात व्यग्र आहे. तर तो हाउसफुल ४ मध्येही दिसणार आहे.
