राज ठाकरे ‘लेखका’च्या भूमिकेत – eNavakal
News महाराष्ट्र

राज ठाकरे ‘लेखका’च्या भूमिकेत

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ओळख म्हणजे मराठी तरुणाच्या मनावर गारुड घालणारा नेता, एक उत्तम वक्ता आणि व्यंगचित्रकार अशी आहे.  मात्र, आता राज ठाकरे लवकरच एका नव्या भूमिकेत सर्वांसमोर येणार आहेत. ते म्हणजे लेखकाच्या. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर ते लवकरच पुस्तक लिहिणार असून त्याची तयारी त्यांनी सध्या सुरू केली आहे.

राज ठाकरे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जीवनावर पुस्तक लिहिणार आहे. या पुस्तकातून राज ठाकरे लता दीदींचा जीवनपट उलगडणार आहेत. त्यांनी यासाठी लतादीदी यांच्या दुर्मिळ छायाचित्रांसाठी पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आणि भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेला भेट दिली. या दोनही संग्रहालयात त्यांनी लता दीदी यांचे दुर्मिळ फोटो बघितले. व हे फोटो आपल्याला पाठवण्याची सबंधित संस्थेला विंनती
केली. यापूर्वी राज ठाकरे यांनी  बाळासाहेब ठाकरे यांचे चरित्र फोटोबायोग्राफीतून मांडले आहे. आता लता मंगेशकर यांच्या पुस्तकासाठी ते कोणता फाॅर्म वापरणार, हे पाहणे औत्सुक्ताचे ठरणार आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
क्रीडा विदेश

गॅरी स्टेड नवे प्रशिक्षक

वेलिंग्टन – न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांचे माजी फलंदाज गॅरी स्टेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जून महिन्यात अगोदरचे प्रशिक्षक असलेल्या माइक हेसन यांनी...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडाच्या मुंबईच्या घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघणार

मुंबई- म्हाडाची मुंबई शहरसाठी अंदाजे एक हजार घरांची ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघाणार असल्याची शक्यता मुंबई मंडळाच्या कार्यालयातून वर्तविण्यात आली आहे. म्हाडाच्या गृहनिर्माण कोकण मंडळाने मुंबई...
Read More
post-image
News मुंबई

पालिका एच-पूर्व कार्यालयाची ‘पाणी वाचवा’ मोहीम कागदावर

मुंबई- पिण्याचे पाणी वाचवा चोरी रोखा पाणी वाया घालवू नका, अशी जनजगृती मोहीम पालिका एच – पूर्व कार्यालयचे पाणी खाते हाती घेणार होते. पण ही...
Read More
post-image
क्रीडा विदेश

मुरलीने ब्लादिमीरला नमवले

अबुधाबी – अबुधाबी आंतरराष्ट्रीय मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या मुरली कार्तिकेयनने सातव्या फेरीत रशियाच्या ब्लादिमीरला फेडोसीवला पराभूत करून स्पर्धेत खळबळ माजवली. या पराभवामुळे स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीमधून...
Read More
post-image
News मुंबई

महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई – भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील...
Read More