तुम्हाला कोणीही धक्का लावणार नाही! राज ठाकरे – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राजकीय

तुम्हाला कोणीही धक्का लावणार नाही! राज ठाकरे

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील रहिवाशांशी संवाद साधला. यावेळी राज यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. तसेच शासकीय वसाहतीत राहणारा मराठी माणूस आहे तो याच जागेवर घर बांधून राहिल. तुम्ही निश्चिंत रहा, बिथरू नका, तुम्हाला कोणीही धक्का लावणार नाही, असे सांगत राज यांनी रहिवाशांना दिलासा दिला.

वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी, संवाद साधण्यासाठी कम्युनिटी हॉल येथे राज ठाकरे यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, जसे मला शिवाजी पार्क तसेच वांद्रे पूर्व आहे. आपल्याच मी तुमच्या घरांसाठी आणि खासकरून मराठीचे अस्तित्व टिकवण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. जसा तुमचा प्रश्न आहे तसाच पोलिसांचा प्रश्न देखील आहे. 30-30 वर्ष काढल्यानंतर त्यालोकांनी जायचे कुठे. हे तुम्हाला बाजुला करण्यासाठी नाही तर बाहेरून येणार्‍या लोकांसाठी जागा रिकाम्या करण्याचा घाट घातला गेला आहे. झोपडपट्ट्या येत नाहीत त्या वसवल्या जातात. अमराठी आणि मराठी बिल्डर लॉबी झोपडपट्ट्या वसवते आहे. बांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे ऑफिसेस आहेत आता त्याठिकाणी मोठाल्या इमारती उभारण्याचा घाट सरकारचा सुरू आहे. या ठिकाणी मराठी टक्का अजिबात नसणार. येथून बुलेट ट्रेन चालली आहे. स्टेशनच इकडे आहे म्हटल्यावर त्या इमारतींमध्ये कोण राहायला येणार हे सांगण्याइतपत तुम्ही काही दुधखुळे नाही. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा पंतप्रधानांचा हट्ट आहे. मुंबई गुजरातला मिळाली नाही ही जखम भरून काढण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राज यांनी केला.

गुजरात सरकारने एक वेबसाईट बनवली आहे. त्यात लिहिले आहे की, जे गुजराती देशाबाहेर राहतात त्यांच्यासाठी गुजराती नावाचे कार्ड काढण्यात आले आहे. हे कार्ड ज्याच्याकडे असेल त्याच्यासाठी गुजरात भेट अविस्मरणीय ठरणार आहे. हे कार्ड बंगाली, मराठी माणसाला नाही तर गुजराती माणसाला दिले जाणार असून याबाबत गुजराती समाजाला काहीच माहिती नसल्याचे राज म्हणाले. तसेच बेहराम पाड्यात उभारलेल्या झोपडपट्ट्यांवरूनही राज यांनी जोरदार प्रहार केला. बांगलादेशातून आलेले बेहरामपाड्यात राहतात. आमच्या राज्यकर्त्यांच्या डोळ्यांदेखत येथे मजलेच्या मजले उभे राहतात. आणि तुम्हाला हे नोटीसा पाठवतात. त्यांच्या मोहल्ल्यात जाण्याची यांच्यात हिंमत नाही. बांगलादेशी आणि पाकिस्तानी तुमचे जावई आहेत का?. अशा खोचक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला इतिहासात बोलायचे इंच इंच लढू, आता इंच इंच विकायला चालले आहेत. वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीत राहणारा मराठी माणूस आहे तो याच जागेवर घर बांधून राहील. सरकारची हिंमत असेल तर त्यांनी तुम्हाला बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करावा, असा इशाराच राज यांनी यावेळी दिला. तसेच जर तुम्हाला सरकारकडून घरे रिकाम्या करण्याच्या नोटीसा आल्या तर राज ठाकरेशी बोला असे आवाहनही त्यांनी यावेळी रहिवाशांना केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
क्रीडा विदेश

गॅरी स्टेड नवे प्रशिक्षक

वेलिंग्टन – न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांचे माजी फलंदाज गॅरी स्टेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जून महिन्यात अगोदरचे प्रशिक्षक असलेल्या माइक हेसन यांनी...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडाच्या मुंबईच्या घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघणार

मुंबई- म्हाडाची मुंबई शहरसाठी अंदाजे एक हजार घरांची ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघाणार असल्याची शक्यता मुंबई मंडळाच्या कार्यालयातून वर्तविण्यात आली आहे. म्हाडाच्या गृहनिर्माण कोकण मंडळाने मुंबई...
Read More
post-image
News मुंबई

पालिका एच-पूर्व कार्यालयाची ‘पाणी वाचवा’ मोहीम कागदावर

मुंबई- पिण्याचे पाणी वाचवा चोरी रोखा पाणी वाया घालवू नका, अशी जनजगृती मोहीम पालिका एच – पूर्व कार्यालयचे पाणी खाते हाती घेणार होते. पण ही...
Read More
post-image
क्रीडा विदेश

मुरलीने ब्लादिमीरला नमवले

अबुधाबी – अबुधाबी आंतरराष्ट्रीय मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या मुरली कार्तिकेयनने सातव्या फेरीत रशियाच्या ब्लादिमीरला फेडोसीवला पराभूत करून स्पर्धेत खळबळ माजवली. या पराभवामुळे स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीमधून...
Read More
post-image
News मुंबई

महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई – भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील...
Read More