राज ठाकरे यांचा “मिसळ महोत्सव” दौरा – eNavakal
उपक्रम मुंबई

राज ठाकरे यांचा “मिसळ महोत्सव” दौरा

मुंबई – राजकीय नेते हे नेहेमीच विविध दौऱ्यावर जात असतात. मात्र, मराठी माणसांच्या प्रश्नावर बोलणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरेही आज दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र हा दौरा राजकीय नसून मराठ-मोठ्या मिसळ महोत्सवाचा आहे. मिसळ ही सर्वसामान्यांची पहिली पसंती म्हणून ओळखली जाते. या मिसळीचीचे विविध प्रकार आपल्याला बघायला मिळतात. लोकांच्या पसंतीची मिसळ त्यांच्यापर्यंत पोहचावी यासाठी भांडूप येथे मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खवय्या भांडुपकरांसाठी चवीची मेजवानी म्हणजेच  मिसळ महोत्सव २०१८ आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव आज सायंकाळी  ५.३० वाजता सह्याद्रि हायस्कूल, छत्रपती शिवाजी महाराज तलावाजवळ, भांडुप (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आला आहे. या नंतर सायंकाळी ६.४५ वाजता वर्सोवा वेल्फेअर हायस्कूल, म्हाडा मैदान, सातबंगला नाका, अंधेरी (पश्चिम) येथे आयोजित केलेल्या महोत्सवालाही ते भेट देणार आहेत.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात

नवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम        

अखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप

मुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...
Read More