राज ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस – eNavakal
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

राज ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकां दरम्यान विविध ठिकाणी जाहीर सभा घेतल्या आहेत. राज ठाकरेंनी व्हिडिओ, फोटोजच्या माध्यमातून भाजप सरकारची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. निवडणुकांच्या रणधुमाळीत राज ठाकरेंच्या या जाहीर सभांची संपूर्ण राज्यात एकच चर्चा होती. मात्र निवडणुक आयोगाने राज ठाकरे यांना सभांच्या खर्चाचा तपशील मागितला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जाहीर सभेत टीका केली. संपुर्ण महाराष्ट्रातील तब्बल दहा ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या. त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. सभेमध्ये त्यांनी फोटोज आणि व्हिडिओच्या माध्यमातून भाजप सरकारच्या योजनांची पोलखोल केली. या दरम्यान त्यांचा ‘लाव रे तो व्हिडिओ’ हे वाक्य मोठ्या प्रमाणात गाजले. मात्र या सभांचा खर्च राज ठाकरेंना सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. मनसे पक्ष नोंदणीकृत असल्याने त्यांना सभांच्या खर्चाचा तपशील सादर करावा लागणार आहे. हा तपशील ९० दिवसांत सादर करावा लागणार आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंद – केंद्राची सूचना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्क्रमातून ‘प्लास्टिकमुक्त अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली होती. महात्मा गांधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More