राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीतही पेट्रोल स्वस्त – eNavakal
देश राजकीय

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीतही पेट्रोल स्वस्त

रत्नागिरी – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून रायगड, मुंबईसह रत्नागिरी जिल्ह्यात 8 ठिकाणी पेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त देण्यात आलं. खेडमधील मेहता पेट्रोल पंपात खेडचे नगराध्यक्ष आणि मनसे नेते वैभव खेडेकर यांच्या हस्ते फीत कापून आणि नारळ वाढवून याचा शुभारंभ करण्यात आला.

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून पेट्रोलवर 4 रुपयांची सवलत देण्यात आली. जिल्ह्यातील 8 तालुक्यातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर पेट्रोल स्वस्त देण्यात आलं. मनसे सरकारमध्ये नसूनही पेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त देत असेल, मोदी सरकारला का शक्य नाही, असा सवाल यावेळी मनसे नेते वैभव खेडेकर यांनी सरकारला केला आहे.

दरम्यान जिल्ह्यातील मंडणगडमध्ये दळी पेट्रोल पंपात पेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त मिळत आहे, तर खेड, दापोली आणि चिपळूणमध्ये मेहता पेट्रोल पंप, गुहागरमधील चिखली येथील पेट्रोलपंप, संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील मैत्री पेट्रोलपंप, रत्नागिरीत टीआरपी येथे असणारा मातृछाया पेट्रोलपंप, तर राजापूर मधील मंगल एजन्सी पेट्रोलपंप, अशा या 8 ठिकाणी पेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त मिळत होतं. मनसेच्या या निर्णयाने सर्वसामान्यांना आजचा एक दिवस दिलासा मिळाला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

वंचित आघाडीने अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदेंना हरविले

मुंबई – महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केला. अशोक चव्हाण यांचा पराभव ‘वंचित’च्या यशपाल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

बंद कर रे टीव्ही!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, मुंबई अशी जिथे जिथे भाषणे घेतली तेथील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडले. याचा...
Read More
post-image
क्रीडा विदेश

#FrenchOpen फ्रेंच स्पर्धेत जोकोविचला नादाल, फेडररकडून धोका

पॅरिस – येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या वर्षातील दुसर्‍या फ्रेंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद स्पर्धेत माजी विजेत्या नोवाक जोकोविचला नादाल-फेडररकडून धोका संभवतो. ही स्पर्धा दुसर्‍यांदा...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : जनतेचे ‘अभिनंदन’ करा  

पुढचा किमान महिनाभर लोकसभा निवडणुकीचे कवित्व चालू राहील. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते हा विजय एकट्या मोदींमुळे कसा मिळाला आणि काँग्रेसचे नेतृत्व कसे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

हा जनतेचा आणि लोकशाहीचा विजय आहे! पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली – आज लोकसभा निवडणूक २०१९चे निकाल जाहीर झाले. भाजपाने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपा मुख्यालयात जल्लोष करण्यात आला. पंतप्रधान...
Read More