राज ठाकरे ‘बर्थ डे स्पेशल’, दुचाकीस्वारांची पेट्रोलपंपावर झुंबड – eNavakal
मुंबई

राज ठाकरे ‘बर्थ डे स्पेशल’, दुचाकीस्वारांची पेट्रोलपंपावर झुंबड

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनसेने मुंबईतील दुचाकीस्वारांना छोटीशी भेट दिली आहे. आज मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर ४ रूपये स्वस्त पेट्रोल देण्यात आले आहे. मुंबईतील काही ठराविक पेट्रोल पंपांवर दुचाकीस्वारांची स्वस्त पेट्रोलसाठी झुंबड पाहायला मिळाली.

राज ठाकरे आज वयाची ५० पूर्ण करत आहे. कर्नाटक निवडणूकीच्या निकालानंतर काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत होती. पेट्रोल दरवाढीविरोधात मनसे आक्रमक झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर मनसेने राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी स्वस्तात पेट्रोल वाटप करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार भायखळा विधानसभा मतदारसंघातील विकी हॉटेलसमोरील पेट्रोल पंपावर दुचाकीस्वारांना मनसेकडून प्रतिलिटर पेट्रोलवर नऊ रुपयांची सवलत देण्यात आली आहे. मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघातील ठराविक पेट्रोल पंपांवर दुचाकीस्वारांची स्वस्त दरात मिळणाऱ्या पेट्रोलसाठी एकच झुंबड उडाली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

#MeToo भूषण कुमारांविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल

मुंबई – ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत देशात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावे समोर आली. यात टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांचाही समावेश आहे. त्यांच्याविरोधात आता मुंबईच्या ओशिवारा पोलीस...
Read More
post-image
महाराष्ट्र

मीरारोड येथे ३ सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू

मीरारोड – मीरा-भाईंदर महापालिकेच्या मलनि:सारण व शुद्धीकरण केंद्रातील सेप्टिक टँकची सफाई करत असताना मीरारोड येथील तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. मुजफ्फर मोहलिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज बचावाची आशा, मात्र एतिहादच्या कठोर अटी

मुंबई – आर्थिक अडचणींमुळे डबघाईला येऊन बंद पडण्याच्या वाटेवर असलेल्या जेट एअरवेजला एतिहाद एअरलाईनच्या नव्या प्रस्तावामुळे जिवंत राहण्याची आशा निर्माण झाली आहे. एतिहाद एअरलाईन ही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

राज्यात डान्सबार पुन्हा सुरू होणार

मुंबई – राज्यभरात डान्सबार पुन्हा सुरू करावे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने साडेपाच तास डान्सबार सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच डान्सबारमध्ये...
Read More
post-image
गुन्हे देश

नवापूरच्या अल्पवयीन मुलीवर गुजरातमध्ये अत्याचार

नंदुरबार – नवापूर येथील अल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या तीन आरोपींवर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित...
Read More