राज ठाकरेंच्या भेटीसाठी अमोल कोल्हे कृष्णकुंजवर – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

राज ठाकरेंच्या भेटीसाठी अमोल कोल्हे कृष्णकुंजवर

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरूर भागातील खासदार अमोल कोल्हे यांनी आज कृष्णकुंजवर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केलेल्या अमोल कोल्हे यांची ही सदिच्छा भेट असल्याचे समजते आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकीय पाटलावरून काढण्यासाठी घेतलेल्या सभांपासून राष्ट्रवादी आणि मनसेची जवळीक वाढू लागली असल्याने महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र येतील, अशी चर्चा अनेक दिवसांपासून रंगली आहे. त्यातच अमोल कोल्हे आणि राज ठाकरेंच्या भेटीबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, यंदा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार असलेल्या अमोल कोल्हे यांनी तीन वेळा खासदार म्हणून निवडणून आलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव यांचा दारुण पराभव करत खासदारकी मिळवली.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या बी777 फ्लाइट ए-191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More