राज्य जलतरण स्पर्धेत पालघरच्या खेळाडूंचे यश – eNavakal
क्रीडा मुंबई

राज्य जलतरण स्पर्धेत पालघरच्या खेळाडूंचे यश

मुंबई – अहमदनगर येथे झालेल्या कुमार-किशोर गटाच्या राज्य अजिंक्यपद जलतरण स्पर्धेत पालघरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करताना 1 सुवर्ण 8 रौप्य आणि 4 कास्यपदकांची कमाई केली. पहिल्या गटात त्यांच्या कृतिका वर्तकने 50 मीटर बटरप्लाय शर्यतीत रौप्यपदक जिंकले. तर 200 मीटर फ्री स्टाईल शर्यतीत कास्यपदक जिंकले. 200 मीटर वैयक्तिक मेडले शर्यतीतदेखील तिने कास्यपदक मिळवले. मुलांच्या दुसर्‍या गटात तनय मुळीकने 1500 मीटर फ्री स्टाईल शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. तसेच 800 मीटर फ्री स्टाईल 50 मीटर बॅकस्टोक आणि 50 मीटर बटरफ्लाय शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. मुलींच्या तिसर्‍या गटात श्रीगौरी हेब्बरने 50 मीटर फ्री स्टाईल आणि 50 मीटर बटरफ्लाय या दोन शर्यतीत दुसरा क्रमांक मिळवला. तर 100 मीटर फ्री स्टाईल आणि 50 मीटर बॅकस्टोक या शर्यतीमध्ये कास्यपदक मिळवले. मुलींच्या तिसर्‍या गटात 50 मीटर मेडले रिले शर्यतीत पालघर संघाने दुसरा क्रमांक मिळवला. या संघात त्रिशा पाटील, साईशा पाटील, श्रीगौर हेब्बर, ध्रिती अहिरवालचा समावेश होता. तर 50 मीटर फ्री स्टाईल रिले शर्यतीतदेखील त्यांच्या याच चमूने रौप्यपदक पटकावले. संघाला दिलीप वैद्य यांचे मार्गदर्शन लाभले. तर नंदन वर्तक संघासोबत व्यवस्थापक म्हणून गेले होते. 26 जिल्ह्यातील 550 पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता अटक

मुंबई,  – खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता असलेल्या एका 45 वर्षांच्या संशयित आरोपीस पुणे एटीएसने अटक केली आहे. त्याचा दहशतवादी कृत्यामध्ये सहभाग असल्याचे काही पुरावे एटीएसच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

चार मराठी चित्रपटांची महिनाभरात 50 ते 60 कोटींची कमाई

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. …आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, नाळ, मुळशी पॅटर्न आणि मुंबई-पुणे-मुंबई 3 या चारही चित्रपटांनी यशाचा चौकार मारला....
Read More
post-image
News मुंबई

पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदतवाढ

मुंबई,- राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना सेवत देण्यात आलेल्या मुदतवाढीचे राज्य सरकारने आज समर्थन केले. त्यांना दिलेली मुदतवाढ ही राज्य आणि केंद्र सरकारने...
Read More
post-image
क्रीडा

बेलेच्या गोलामुळे माद्रिदचा विजय

माद्रिद – स्पॅनिश साखळी फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य रियल माद्रिदने बेलेने नोंदवलेल्या एकमेव गोलांच्या जोरावर शानदार विजय मिळवला. माद्रिदने आपल्या साखळी लढतीत तळाला असलेल्या ह्यूसेका...
Read More
post-image
Uncategoriz

मुंबई विमानतळावरून 24 तासांत तब्बल 1004 विमाने ये-जा झाली

मुंबई – सर्वाधिक वर्दळ असलेला विमानतळ म्हणजे मुंबई विमानतळ. स्वतःचाच विक्रम मुंबई विमानतळाने पुन्हा एकदा मोडीत काढला, 8 डिसेंबरला 24 तासात मुंबई विमानतळावर 1004...
Read More