राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; नांगरे-पाटील नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; नांगरे-पाटील नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान आयुक्त रविंद्र सिंघल यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागी त्यांची वर्णी लागली आहे. सिंघल यांची औरंगाबादच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच मुंबई एटीएसचे पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांच्यावर कोल्हापूरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक पी. पी. मुत्याल यांच्यावर नांदेडच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक एफ. के. पाटील यांच्यावर पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस महानिरीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद यांच्यावर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या पोलीस महानिरीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने शेअर केला रोमॅण्टिक फोटो

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने काल आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिनी बॉलिवूडकडून तंच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. तर याच खास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर

ओसाका – जपानच्या ओसाकामध्ये आजपासून जी-२० परिषदेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेत सामील होण्यासाठी ओसाकाला पोहोचले आहेत. मोदी ओसाका विमानतळावर पोहोचताच त्यांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कैलास मानसरोवर यात्रेतील २०० भारतीय भाविक नेपाळमध्ये अडकले

काठमांडू – तिबेटमध्ये कैलास मानसरोवरची यात्रा करून घरी परतणारे जवळपास २०० भारतीय भाविक हवामान बदलामुळे नेपाळच्या हुमला जिल्ह्यात अडकले आहेत. दरवर्षी शेकडो भारतीय भाविक शंकराच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 आज भारतासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होणार आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More