राज्यात आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार – eNavakal
महाराष्ट्र

राज्यात आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार

मुंबई – जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती. मात्र सध्या आठवडाभरापासून कोकण वगळता इतर भागांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. परंतु आजपासून राज्यात पाऊस पुन्हा जोर धरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, तर मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे. दरम्यान, पावसाच्या विश्रांतीमुळे राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीपार गेल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे पावसाच्या सरींनी जनतेला पुन्हा दिलासा मिळणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार १८ आणि १९ जुलैला कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २० आणि २१ जुलैला राज्यात सर्वच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या दोन दिवशी काही ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.

दरम्यान, पावसाच्या विश्रांतीमुळे राज्याच्या बहुतांश भागात तापमानाचा पारा वाढला आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ३७ ते ३८ अंश सेल्सिअसच्या असून, तो सरासरीच्या तुलनेत ५ ते ७ अंशांनी अधिक आहे. तर मराठवाड्यातही कमाल तापमान वाढून  ते ४ ते ६ अंश पुढे गेले आहे. तसेच सोलापूर आणि नगरचा पारादेखील वाढला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

पालघर आजही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले

पालघर – जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात भुकंपाचे धक्के आज पहाटे 5.22 मिनिटांनी जाणवले आहेत. हे धक्के 3.8 रिश्टर स्केल असल्याचे सांगण्यात आले आहेत....
Read More
post-image
देश

१३ दिवसांच्या उपोषणाने स्वाती मालीवालची प्रकृती बिघडली

नवी दिल्ली – बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला अटक केल्यानंतर सहा महिन्यांच्या आत फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या १३ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

उद्धव ठाकरेंचे सर त्यांच्याविषयी सांगतात…

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तम छायाचित्रकार आहेत, ही बाब कमी जणांना माहित आहे. मात्र त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनांच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विराटची टीम इंडिया आज वेस्ट इंडीजला भिडणार

चेन्नई – टी-२० मालिकेपाठोपाठ आजपासून भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला प्रारंभ होत आहे. विराट कोहलीचा भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, बांगलादेश यांच्यापाठोपाठ आता...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आज दुपारी १२ वाजता विरोधी पक्षांची बैठक; १ वाजता पत्रकार परिषद

नागपूर – उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती आखण्याबाबत आज विरोधी पक्षांची बैठक पार पडणार आहे. आज दुपारी १२ वाजता रविभवनातील विरोधी...
Read More