राज्यातील 26 धरणांमधील पाणीसाठी शून्य टक्क्याखाली – eNavakal
News महाराष्ट्र

राज्यातील 26 धरणांमधील पाणीसाठी शून्य टक्क्याखाली

मुंबई – यंदा महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ पडला असून राज्यभरातील जनता पाणीप्रश्नाने अक्षरशः मेटाकुटीस आली आहे. जलसंधारण विभागाने आपल्या संकेतस्थळावर आज महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठ्याची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या आकडेवारीद्वारे महाराष्ट्रातील तब्ब्ल 26 धरणांमधील पाण्याची उपलब्धता शून्य टक्क्यांखाली पोहोचली असल्याचे उघड झाले आहे.
जलसंधारण विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार औरंगाबाद, बीड, हिंगोली, परभणी आणि उस्मानाबाद या 5 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या औरंगाबाद विभागातील पाणीसाठा 18 मे च्या ताज्या आकडेवारीनुसार केवळ 0.43 टक्के इतका आहे. पैठण, मंजरा, माजलगांव, येलदारी, सिद्धेश्वर, तेरणा, सिना कोलेगाव आणि धूदना या धरणांमधील पाणीसाठ्याने सध्या तळ गाठला असून जलसंधारण विभागाच्या आकडेवारीनुसार या धरणांमध्ये पाणीसाठ्याचे प्रमाण शून्य टक्के आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात या धरणांमध्ये पैठण 34.95 टक्के, मांजरा 21.24 टक्के, माजलगांव 17.5 टक्केआणि तेरणा 52.03 टक्केएवढे पाणी शिल्लक होते. मात्र यंदा ही पातळी शून्यापर्यंत आली आहे. शून्य टक्के पाणी पातळी गाठलेल्या आणखीन धरणांमध्ये नागपूर विभागातील गोशीखुर्द, दीना आणि नंद, जळगा विभागातील अप्पर तापी हत्नूर, नाशिक विभागातील वाकी, भाम, भावली आणि पुणेगाव, पुणे विभागातील, दिबे, घोड, पिंपळगाव जोगे, वडाज आणि टेमघर, सोलापूर विभागातील भीम, कुंडली टाटा आणि लोणावळा टाटा या धरणांचा समावेश आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा समाजाच्या आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

करण जोहर ठरला सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चित्रपट निर्माता

मुंबई – चित्रपट निर्माता करण जोहर बॉलिवूडच्या लोकप्रिय चित्रपट निर्मात्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाने गेल्या सहा महिन्यातील बॉलिवूडच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट निर्मात्यांची नुकतीच एक...
Read More