राज्यातील विविध प्रकल्पांचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा – मंत्री एकनाथ शिंदेेंची माहिती – eNavakal
News मुंबई

राज्यातील विविध प्रकल्पांचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा – मंत्री एकनाथ शिंदेेंची माहिती

मुंबई- आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेण्यात आला, अशी माहिती कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच सध्या कांद्याने शंभरी पार केल्याने सर्वसामान्य जनतेच्या खिशाला चाट बसत आहे. कांद्याच्या भाववाढीबाबतही आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. कांद्याचे भाव नियंत्रणात आले पाहिजेत. सर्वसामान्यांना कांदा विकत घेता यावा यासाठी सरकार गांभीर्याने विचार करत असून हे सरकार लोकांना अडचणीत येऊ देणार नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. तब्बल चार तास चाललेल्या या बैठकीत राज्यातील अनेक प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर बोलताना कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, राज्याच्या हितासाठी जे जे काही करावे लागेल ते करण्याचा निर्णय आणि चर्चा बैठकीत झाली. नवीन सरकार आहे, नवीन मुख्यमंत्री आहेत. राज्याची आर्थिक स्थिती पाहता प्राथमिकता कुठल्या प्रकल्पाला दिली पाहिजे, हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. जे विकास प्रकल्प राज्याच्या हिताचे आहेत ते मुख्यमंत्री थांबवणार नाहीत. तसेच मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबत मागणी करण्यात येत आहे. यावरही बैठकीत चर्चा झाली असून मराठा आंदोलकांच्या नेत्यांशी मुख्यमंत्री स्वतः चर्चा करणार असल्याचे शिंदे म्हणाले. भीमा-कोरेगाव प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली जाईल. हे सरकार सुडबुध्दीने वागणारे नाही, असेही शिंदे म्हणाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

भांडूप स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रल्वे विस्कळीत

मुंबई – मध्ये रेल्वेवरील भांडूप रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अप आणि डाऊन धीम्या तसेच जलद मार्गांवर परिणाम झाला आहे. यामुळे काही काळासाठी...
Read More
post-image
ट्रेंडिंग तंत्रज्ञान

जिमला जाताय? मग या गोष्टी ध्यानात ठेवाच!

जिमिंग करणं हे आजच्या तरुणाईचं एक स्टेटस सिम्बॉल झालं आहे. त्यामुळे कामाच्या धबडग्यातून वेळ काढत प्रत्येकजण जिमला जातोच. पण जिमिंग करताना अनेक गोष्टींची काळजी...
Read More
post-image
देश

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याला पकडले

जम्मू – जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला भागात दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाच्या एका दहशतवाद्यास पोलिसांनी अटक केली आहे. १९ वर्षीय शाजिद फारुख डार या दहशतवाद्यास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला अटक

पाटणा – जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयु) शरजील इमाम या विद्यार्थी नेत्याला अटक करण्यात आली आहे. देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या शरजील इमामला बिहारमधील जहानाबाद या ठिकाणाहून...
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

भाजपाचे राज्यातील १० नेते राजधानीत

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर दिल्ली विधानसभा काबीज करण्यासाठी भाजपनेही जय्यत तयारी केली...
Read More