राज्यातील महापूर मानवनिर्मित ! न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा – eNavakal
News महाराष्ट्र

राज्यातील महापूर मानवनिर्मित ! न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा

सातारा,- कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही मानवनिर्मित आहे, असा दावा करून भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून प्रशासनाची जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी असे विनंती करणारे पत्र सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय लाखे-पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांना पाठवून सुमोटो याचिका दाखल करून घ्यावी अशी विनंती केली आहे. चौदा वर्षापूर्वी 2005 मध्ये आलेल्या महापूरानंतर डिजास्टर मॅनेजमेंटच्या 2005 ची मार्गदर्शक तत्वे निश्‍चित करण्यात आली. मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांनी 1 ऑगस्टला स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटला अलमट्टी धरणातील पाणी न सोडल्यास मोठ्याप्रमाणात पाणी तुंबून महापुराची शक्यता वर्तविली होती. मात्र त्या संदर्भात कर्नाटक सरकारशी संपर्क साधण्यात आला नाही. डिजास्टर मॅनेजमेेंटने ही जबाबदारी टाळली. पावसाबरोबरच धरणातील अतिरिक्त पाण्याचा साठा सोडण्यासंदर्भात दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब केला गेला नाही. धरण तुडूंब भरल्याने ते सोडण्यात आले. त्यातच पावसाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पुरस्थिती निर्माण झाली. डिजास्टर मॅनेजमेेंटच्या 2005 च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन न झाल्याने ही आपत्ती मानवनिर्मित असल्याचे घोषित करण्यात यावे, तसेच या उद्भवलेल्या आपत्तीची स्टेट डिजास्टर मॅनेजमेेंट चेअरमन, चिफ सेक्रेटरी, संबंधित खात्यातील मंत्री तसेच डॅम ऑपरेटर यांच्यापैकी दोषी व्यक्तींवर जबाबदारी निश्‍चित करावी अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे. याप्रकरणाची न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती स्थापन करून चौकशी करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

बाबरी मशिदीसाठी मिळाली ‘ही’ जागा

अयोध्या- अयोध्येपासून ३० किमी दूर असलेल्या धन्निपूर येथे बाबरी मशिद बांधण्यास पाच एकर जमीन सुन्न वक्फ बोर्डाला देण्यात आली आहे. ही जागा स्विकारण्याचा निर्णय...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी- अण्णा हजारे

अहमदनगर – फक्त गावचे सरपंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. सरपंच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

#TrumpInIndia ताजने आम्हाला प्रेरित आणि चकीत केलं- डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प आणि जावई जॅरेड कुशनर यांच्यासह आज पहिल्यावहिल्या भारत भेटीवर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माळेगावचा पहिला निकाल, अजित पवारांच्या पॅनलला यश

बारामती -अतितटीच्या ठरलेल्या माळेगाव कारखानच्या निवडणुकीत ब वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्वप्नील जगताप यांनी विजय मिळवला आहे. अन्य २० जागासाठी मतमोजणी सुरू आहे. माळेगाव कारखान्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

जयसिद्धेश्वर महाराजांची खासदारकी धोक्यात

सोलापूर – सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर महाराजांच्या जातीचा दाखला रद्द करण्यात आला आहे. जात पडताळणी समितीने हा दाखला बनावट असल्याचे सांगत रद्द केला. त्यामुळे...
Read More