राज्यातील पूरग्रस्तांसाठी केंद्राकडे ६,८१३ कोटींची मागणी करणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील पूरग्रस्तांसाठी केंद्राकडे ६,८१३ कोटींची मागणी करणार

मुंबई – राज्यातील पूरग्रस्तांसाठी ६ हजार ८०० कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे करणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज झालेल्या मंत्री परिषदेच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. प्राथमिक माहितीनुसार आलेला अहवाल आपण केंद्राला पाठवत असून कोल्हापुर, सांगली आणि सातारा भागासाठी 4700 कोटी तर कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी 2105 कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्रात युद्ध पातळीवर बचावकार्य करणाऱ्या नौदल, वायू दल आणि एनडीआरएफच्या जवानांचे त्यांनी आभार मानले.

ज्या भागात जनावरे दगावले आहेत तिथे ३० कोटी रुपये, तात्पुरत्या छावण्यांसाठी २७ कोटी रुपये, रस्त्यांच्या डागडुजीसाठी ५७६ कोटी रुपये, व्यावसायिकांसाठी ५० हजार रुपये, स्वच्छतेसाठी ७९ कोटी रुपये, पिकांच्या नुकसान भरपाईसाठी २ हजार ८८ कोटी रुपये आणि घरांच्या नुकसान भरपाईसाठी २ हजार २२२ कोटी रुपयांची मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

मंत्री परिषद बैठकीतील निर्णय

1. राज्यातील सांगली, कोल्हापूर, साताऱ्यासह इतर जिल्ह्यात पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत केंद्र सरकारकडे 6813 कोटींची मागणी करणार.

2. जागतिक बँकेच्या सहाय्याने केंद्र शासन पुरस्कृत स्कील स्ट्रेंदनिंग फॉर इंडस्ट्रियल व्हॅल्यू एनहान्समेंट (STRIVE) प्रकल्प महाराष्ट्र राज्यात राबविण्यास मान्यता.

3. राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य व उद्योजकता विकास तसेच क्षमता वृद्धिंगत (Capacity Building) करण्यासंदर्भातील योजनांचे एकसुत्रीकरण.

4. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेची व्याप्ती वाढवून गावात वन्यप्राण्यांकडून होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी संवेदनशील गावांच्या वनसीमेवर प्रायोगिक तत्त्वावर लोखंडी जाळीचे कुंपण उभारण्याचा निर्णय.

5. महापौर व उपमहापौर यांच्या निवडणुका विधानसभेची आगामी सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत तीन महिने पुढे ढकलण्यास मंजुरी.

6. नागपूर येथील महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या सेवानिवृत्त 371 कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर करण्यास मान्यता.

7. महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीच्या पहिल्या अनुसूचीमध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागास नेमून दिलेल्या विषयांमध्ये मराठा आरक्षण, राज्य मागासवर्ग आयोग व इतर संबंधित विषयांचा समावेश.

8. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888, महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी.

9. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये तत्कालीन कालावधीत विविध पदांवरुन गैरप्रकार केलेल्यांबाबत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी.

10. संगमनेर (जि. अहमदनगर) येथील मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक 76 क्रीडांगणातून 4250 चौरस मीटर क्षेत्र आरक्षणातून वगळून प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान या प्रयोजनासाठी आरक्षित करण्यास मंजुरी.

11. भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्र विकास योजनेतील, पिंपळास तसेच रांजनोळी (ता. भिवंडी) येथील निर्देशित क्षेत्र खेळाचे मैदान या आरक्षणामधून वगळून वाणिज्य वापर विभागात समाविष्ट करण्यास मंजुरी.

12. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ या उपक्रमाच्या पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

आजपासून मुंबईत 10 टक्के पाणी कपात

मुंबई- पिसे उदंचन केंद्रातील दुरुस्ती कामामुळे मुंबईत 3 ते 9 डिसेंबर 2019 या कालावधीत नियोजित 10 टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली होती. मात्र ती...
Read More
post-image
News विदेश

फ्लोरिडात गोळीबार! हल्लेखोराला कंठस्नान

फ्लोरिडा – अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये आज पेनसाकोला स्थित नौदलाच्या तळावर गोळीबार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. एका बंदुकधार्‍याने नौदलाच्या तळाला लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला....
Read More
post-image
News मुंबई

महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा सुरेश काकाणींनी पदभार स्विकारला

मुंबई – महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तसेच मिहान इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष सुरेश काकाणी यांची मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून राज्य...
Read More
post-image
News मुंबई

पावणेदोन कोटीच्या घरफोडी! सात वषार्र्ंनी आरोपीस अटक

मुंबई – गोवंडी येथे जी. एस. ज्वेलर्स दुकानातील कुलूप तोडून आतील 1 कोटी 82 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेणार्‍या टोळीतील एका आरोपीला...
Read More
post-image
News मुंबई

हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंध नाही! गौतम नवलखांचा हायकोर्टात दावा

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या गौतम नवलखा यांचा हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी कोणताच संबंध नव्हता....
Read More