राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागे – eNavakal
आघाडीच्या बातम्या आरोग्य महाराष्ट्र

राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागे

मुंबई – महाराष्ट्र सरकारद्वारे चालविण्यात येणार्‍या रुग्णालयांतील साडेचार हजार निवासी डॉक्टरांनी बुधवारपासून बेमुदत संप पुकारला होता. त्यामुळे मुंबईसहीत राज्याच्या अनेक शहरांतील रुग्णांचे अतोनात हाल झाले. त्याच दिवशी रात्री वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’चे प्रतिनिधी यांच्यात डॉक्टरांच्या मागण्यांबाबत बैठक पार पडली. या बैठकीत विद्यावेतन वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळात पाठविण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले व डॉक्टरांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच राज्यसरकारने संपकरी डॉक्टरांवर मेस्मा लावून कायदेशीर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा दिला. त्यानंतर हा संप रुग्णहिताच्या दृष्टीने मागे घेण्यात आल्याचे मार्डने जाहीर केले. हा संप मागे घेण्यासाठी डॉक्टरांना गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार डॉक्टर गुरुवारी सकाळी ८ वाजताच आपापल्या ड्युटीवर रुजू झाले. परंतु ३१ ऑगस्टपर्यंत विद्यावेतन वाढीसह इतरही मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही मार्डकडून देण्यात आला आहे.

‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) विधेयकाला विरोध, उशिरा मिळणारे विद्यावेतन, विद्यावेतनात पाच हजाराने वाढ, क्षयरोग झालेल्या डॉक्टरांना सुटी व प्रसुती रजा देण्याची मागणी लावून धरत बुधवारी राज्यातील सर्व निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले होते. यावेळी काही नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. केवळ तातडीच्या शस्त्रक्रिया झाल्या. डॉक्टरांच्या मागण्यांबाबत पार पडलेल्या सेंट्रल मार्डसोबत वैद्यकीय शिक्षण संचालकांच्या बैठकीत बैठकीत पाच हजार रुपयांनी विद्यावेतन वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळात पाठविण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. शिवाय, क्षयरोगबाधित डॉक्टरांना पगारी सुट्टी व महिला डॉक्टरांना प्रसुती रजा मंजुरीसाठी वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More
post-image
महाराष्ट्र

तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त

ठाणे – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली...
Read More