राज्यातील धार्मिक स्थळं सुरू होणार का? राजेश टोपेंनी दिली महत्त्वपूर्ण माहिती – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील धार्मिक स्थळं सुरू होणार का? राजेश टोपेंनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

अहमदनगर – राज्यातील मंदिरे सुरू व्हावीत अशी सर्वच स्तरांतून मागणी केली जात आहे. मात्र, राज्य सरकारकडून धार्मिक स्थळं सुरू करण्यास हिरवा कंदील अद्यापही मिळालेला नाही. यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, धार्मिक स्थळांबाबत लोक भावनिक असतात. त्यामुळे तिथे सोशल डिस्टन्सिंग हे पालन होणार नाही. म्हणून राज्यातील धार्मिक स्थळं सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही.

राजेश टोपे धार्मिक स्थळांबाबत म्हणाले की, धार्मिक स्थळ, जिम, विमान सेवा सुरू करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणे गरजेचे आहे. मात्र धार्मिक स्थळांमध्ये लोक भावनिक असतात. त्यामुळे तिथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही. जर काटेकोरपणे पालन केले तर धार्मिकस्थळ सुरु करण्यास कोणी विरोध करणार नाही. मात्र ईश्वर हा सर्वत्र आहे. त्यामुळे थोडी सबुरी बाळगून वेळ लागला तरी हरकत नाही असे राजेश टोपे म्हणाले.

दरम्यान नुकतंच नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी “मंदिर पुन्हा सुरु करावी, अशी विनंती सरकार दरबारी करा,” अशी मागणी त्यांनी राज ठाकरेंकडे केली. यावेळी राज ठाकरेंनी “धार्मिक स्थळं उघडायला हवीत परंतु धार्मिक स्थळं उघडल्यानंतर झुंबड उडाली तर काय? असा प्रश्न विचारला. तसेच त्याची एक नियमावली ठरवावी लागेल, मी सरकारशी बोलतो. कारण मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत? असेही राज ठाकरेंनी सांगितले

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील धार्मिक स्थळं सुरू होणार का? राजेश टोपेंनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

अहमदनगर – राज्यातील मंदिरे सुरू व्हावीत अशी सर्वच स्तरांतून मागणी केली जात आहे. मात्र, राज्य सरकारकडून धार्मिक स्थळं सुरू करण्यास हिरवा कंदील अद्यापही मिळालेला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

भारतीय संगीतातील सूर हरपला, पंडित जसराज यांचं निधन

न्यू जर्सी – पद्मविभूषण पंडित जसराज यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे. भारतीय शास्त्रीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील बदल्यांची सीआयडी चौकशी करा, अन्यथा न्यायालयात दाद मागू-चंद्रकांत पाटील

पुणे -कोरोना काळात राज्यात झालेल्या बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी सीआयडी चौकशी करावी अशी मागणी...
Read More
post-image
देश

एअरटेल, वोडाफोन आयडीयाचे रिचार्ज महागणार

नवी दिल्ली -लॉकडाऊनच्या काळात सर्वंच कंपन्यांची दिवाळं निघालेलं असताना टेलिकॉम कंपन्यांनाही लॉकडाऊनचा फटका बसला आहे. त्यामुळे कंपन्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी एअरटेल, वोडाफोन – आयडिया...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत एकूण मृतांचा आकडा ५०० पार, आज नव्या २५० बाधितांची नोंद

कल्याण -कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना बळींच्या संख्येने ५०० चा आकडा ओलांडला असून आतापर्यंत महानगरपालिका क्षेत्रात कोरोनामुळे तब्बल ५०३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत....
Read More