राज्यातील खाजगी इंग्रजी शाळा आज ‘बंद’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या आंदोलन महाराष्ट्र

राज्यातील खाजगी इंग्रजी शाळा आज ‘बंद’

मुंबई – राज्यभरातील इंग्रजी शाळा आज बंद राहणार आहेत. शिक्षण हक्क (आरटीई) अंतर्गत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्ती तातडीने द्यावी आणि इतर मागणीसाठी इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशनने (ईसा) हा निर्णय घेतला आहे. या बंदमध्ये 29 जिल्ह्यातील साडे चार हजार इंग्रजी शाळा सहभागी होणार आहेत. ताडेच या बंदला मुंबई स्कूल बस असोशिएशननेही पाठिंबा दिला आहे. मुंबईतील 140 शाळांच्या स्कूल बस सेवा बंद राहणार आहेत. मात्र ज्या इंग्रजी शाळांमध्ये प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा आहेत, त्या शाळा बंदमधून वगळल्याचं ईसाने सांगितले आहे.

आरटीईअंतर्गतघेण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशांसाठी राज्य सरकारने शाळांना ४०७ कोटींचा निधी उपलब्ध करून देत आज होणारे शाळा बंद आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली आहे. मात्र थकीत ९०० कोटींपैकी ६०० कोटी न मिळाल्याने तसेच इतर मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा न झाल्याने आज राज्यातील २५ हजार खासगी इंग्रजी शाळा बंद राहणार आहेत. मात्र याचा परिणाम बोर्डाच्या परीक्षांवर होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
Uncategoriz देश

कर्नाटक मुख्यमंत्री येडियुरप्पांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोना

बेळगाव- मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांचे गृह कार्यालय कृष्णा येथील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची (Corona Infected) लागण झाली आहे. टेलिफोन ऑपरेटर, दोन...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई

विकास दुबेच्या दोन साथीदारांना ठाण्यात पकडलं, महाराष्ट्र एटीएसची कामगिरी

मुंबई – उत्तर प्रदेशातील आठ पोलीस हत्याकांडातील दोन आरोपींना ठाण्यातील कोलशेत येथून अटक करण्यात आली आहे. हे दोघेही विकास दुबेचे साथीदार होते. दरम्यान, या हत्याकांडातील...
Read More
post-image
मनोरंजन

बिहारमधील ‘या’ रस्त्याला सुशांत सिंह राजपुतचे नाव

पाटणा – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या (Sushant Sing Rajput Suicide Case) निधनाचा देशभरातील चाहत्यांना धक्का बसला आहे. लोक आपआपल्यापरिने त्याला श्रद्धांजली देत आहेत. नुकतेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

घरगुती गणेशोत्सवावरही मर्यादा! राज्य सरकारने जारी केली मार्गदर्शक सूचना

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याच आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार अनेक गणेशमंडळांनी गणेशमूर्ती न बसवता आरोग्य उत्सव साजरा करण्याचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दिल्लीतील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा रद्द, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीयांची घोषणा

नवी दिल्ली – कोरोनाची (corona pandemic) परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील सर्व विद्यापीठांच्या आणि अंतिम वर्षांच्या परीक्षा यंदा रद्द करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने (Delhi Government) घेतला...
Read More