राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेला दणक्यात सुरुवात – eNavakal
क्रीडा मुंबई

राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेला दणक्यात सुरुवात

मुंबई- पुणे डॉक्टर्स संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘डॉक्टर्स प्रीमियर लीग’ राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेला गुरुवारी दणक्यात सुरुवात झाली. ही स्पर्धा चार फेब्रुवारीपर्यंत नेहरू स्टेडियम, स्वारगेट आणि शिंदे हायस्कूल, सहकारनगर येथील मैदानावर रंगेल. या स्पर्धेबाबत अधिक माहिती सांगताना पुणे डॉक्टर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ. संभाजी करंडे आणि डॉ. राजेश माने यांनी सांगितले की, दरवर्षी विविध राज्यातील डॉक्टर्ससाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या वर्षीच्या ‘डॉक्टर्स प्रीमियर लीग’मध्ये 12 संघांचा समावेश आहे. स्पर्धेत पुण्यासह, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सांगली, ठाणे, रायगड, मुंबई व पनवेल या शहरातील डॉक्टरांचे संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेत 12 संघांचे 4 गट करण्यात आले आहेत. पुणे रॉयल इगल्स, पुणे वॉरियर्स, जीवनज्योत व्हीसीकेडीए, कोल्हापूर किलर्स, सांगली स्ट्राईकर्स, हृदयस्पर्श सांगली स्पार्टन्स, नाशिक मास्टर्स, ठाणे सुर्पब, राजगड राजे, पनवेल युवा, जीएमसी मुंबई व मुंब्रा कास्पा हे संघ स्पर्धेत झुंजणार आहेत. ‘पीडीसी’चे कमिशनर डॉ. अनिल लिंगडे म्हणाले की, स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व 50 हजार रुपयांचे पारितोषिक व उपविजेत्या संघाला करंडक व 31 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहेत. तसेच सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू, सामनावीर व मालिकावीर अशी विविध पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More