राज्यभरात विसर्जनादरम्यान 20 जणांचा बुडून मृत्यू – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

राज्यभरात विसर्जनादरम्यान 20 जणांचा बुडून मृत्यू

मुंबई –  ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी करीत मुंबईसह राज्यभरातील गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. ठिकठिकाणी डीजे, डॉल्बीऐवजी ढोलताशांचा गजर दिसत होता. दरम्यान, राज्यभरात विसर्जनादरम्यान 20 जणांचा बुडून मृत्यू झाला, तर मुंबईतील लालबाग राजाचे विसर्जन 22 तासांनंतर करण्यात आले.

मुंबईसह, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगलीसारख्या शहरासह संपूर्ण राज्यात गणेशमूर्तींचे थाटात विसर्जन झाले. यावेळी डीजे, डॉल्बीवरील बंदीमुळे मिरवणुकांचा दणदणाट कमी होता, पण ढोलताशांचा आवाज मात्र चांगलाच घुमताना दिसला. पुण्यातील पाचही मानाच्या बाप्पाांसह इतर मंडळाच्या बाप्पांना रविवारी निरोप देण्यात आला. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे आज पहाटे पाचच्या सुमारास
विसर्जन झाले.

मुंबईत यंदा लालबाग राजाचे 22 तासांनी विसर्जन झाले. दुपारी 12 वाजता लालबाग राजाची आरती घेऊन मिरवणुकीस सुरुवात झाली. ‘कोण आला रे कोण आला, लालबागचा राजा आला’, ‘ही शान कुणाची, मुंबईच्या राजाची’ अशा गगनभेदी घोषणांनी लालबागचा परिसर दणाणून निघाला होता. गणेश गल्लीचा ‘मुंबईचा राजा’ही मोठ्या थाटामाटात मिरवणुकीने निघाला होता. मुंबईतील विविध चौपाट्यांवर, तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले. गिरगावचा राजा, खेतवाडीचा राजा, फोर्टचा राजा, कुंभारवाड्याचा गणराजा, उमरखाडीचा राजा, चेंबूरचा सम्राटचा राजा आदी मोठ्या गणेशमूर्तींचे मध्यरात्री विसर्जन करण्यात आले. अशाप्रकारे गणपती विसर्जन करताना राज्याच्या काही भागात काही दु:खद घटना घडल्या. वाशिम, पुणे, जुन्नर, जालना, भंडारा, अमरावती, बुलढाणा, शिर्डी, सोलापूर, संगमनेर आदी ठिकाणी 20 जणांचा बुडून मृत्यू झाला.जालन्यात निहाल चौधरी, शेखर भदनेकर, अमोल रणमुळे यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. तर भंडार्‍याच्या पवनी तालुक्यात सिंगोरी गावातही वैभव आडे व संकेत कनाके यांचा मामा तलावात बुडून मृत्यू झाला. त्याचप्रमाणे बुलढाण्यातील मेहकर तालुक्यात महादेव ताकतोडे आणि पुरुषोत्तम सोळाके यांचा धरणात
बुडून मृत्यू झाला.

गिरगाव चौपाटीवर कोळ्यांची बोट उलटली – 
गिरगाव चौपाटीवर लालबाग राजाच्या विसर्जनासाठी वापरली जाणारी कोळी बांधवांची एक बोट बुडाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बोटीतील सर्वांना वाचविण्यात आले. काहींना नायर रुग्णालयात दाखल केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

आतापर्यंत ९ लाख २६ हजार १४० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

मुंबई – राज्यातील 52 हजार 427 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 जुलै ते 11 जुलै पर्यंत राज्यातील 58 लाख 35...
Read More
post-image
आरोग्य कोरोना महाराष्ट्र मुंबई

कल्याण डोंबिवलीत सर्वाधिक ६६१ रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवलीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येने ६०० चा आकडा ओलांडत १२ हजारांचा टप्पा गाठला आहे. आज कल्याण डोंबिवलीमध्ये सर्वाधिक ६६१ रुग्णांची...
Read More
post-image
आरोग्य कोरोना महाराष्ट्र मुंबई राजकीय

धारावी कोरोनामुक्तसाठी राजकीय श्रेयवाद, शिवसेना-भाजपमध्ये जुंपली

मुंबई – दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. याची दखल खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली. मात्र त्यामुळे राज्यात आता नवा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

घोडे तबेल्यातून फरार झाल्यावर जाग येणार का? सिब्बलांचा थेट सवाल

नवी दिल्ली – राजस्थानमधील उपमुख्यमंत्री सचिन पायलट भाजपच्या वाटेवर आहेत. शिवाय त्यांच्यासोबत काही आमदारही फुटण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल...
Read More
post-image
महाराष्ट्र

लॉकडाऊनआधीच पुण्यात नवनियुक्त आयुक्तांनी स्विकारला पदभार

पुणे – पुण्यात उद्या १३ जुलैपासून लॉकडाऊन जारी करण्यात येणार आहे. त्याआधीच पुण्यात नवनियुक्त महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पदभार स्विकारला आहे. वाचा – धारावी...
Read More