मुंबई – देशभरात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातही मुंबईत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबई पालिकेच्या वॉर रुमला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी अनेक चिंताजनक माहिती सांगितली. मुंबईत कोरोना बाधितांची संख्या १६२ वर पोहोचली असून अजून ५ हजार लोक हाय रिस्कवर आहेत. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे असं ते म्हणाले.
मुंबई पालिकेच्या वॉर रुमला भेट दिल्यानंतर त्यांनी बैठक घेतली. या बैठकीत अश्विनी भिडे यांच्यासहीत अनेक अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १६२ झाली आहे. पाच हजारांहून अधिक जण असे आहेत जे अशा लोकांच्या संपर्कात आले असून हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आहेत. ही संख्या आता ५३४३ इतकी आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेऊन चाचणी केली जाणार आहे. सध्या सर्वांवर लक्ष ठेवलं जात आहे. चार हजार लोक या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत”. दरम्यान मुंबईतील वाढता आकडा चिंतेची बाब आहे. पुढे हे आव्हान कसं पेलायचं यासंबंधी बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाला आज भेट दिली. कोरोनाशी सामना करण्याच्या दृष्टीने उभारलेल्या यंत्रणेचा आढावा घेतला. ही यंत्रणा सक्षमपणे काम करत आहे.#CoronaVirusUpdates#MeechMazaRakshak#मीचमाझारक्षक#मैंहीमेरारक्षक pic.twitter.com/owRmxrTE4z
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 1, 2020
“मुंबई शहरात पाच सरकारी, सात खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनची चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध असून दोन हजार चाचण्या दिवसाला होऊ शकतात इतकी क्षमता आहे. पण सध्या दिवसाला १२०० चाचण्या होत आहेत. जे प्रोटोकॉल आहेत त्याप्रमाणे चाचणी केली जात आहे. त्यामुळे अतिरिक्त करण्याची आज गरज नाही. तसंच ४६ नवे व्हेंटिलेटर्स आज मिळाले आहेत. १ लाख एन-९५ मास्क उपलब्ध आहेत,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
बृहन्मुंबई महानगरपालिका येथे Covid19 योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी सज्जता बैठक घेण्यात आली. यावेळी श्रीमती अश्विनी भिडे IAS व श्री काकानी अतिरिक्त आयुक्त व इतर संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती pic.twitter.com/SbIu4B6vbl
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 1, 2020