राजू शेट्टीं यांचा सत्याग्रहाचा इशारा – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राजू शेट्टीं यांचा सत्याग्रहाचा इशारा

मुंबई- दुध उत्पादक शेतकर्‍यांना प्रति लिटर पाच रूपये दर मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी आजपासून मुंबईचे दुध रोखण्याचा इशारा दिला होता. काल मध्यरात्री पंढरपूरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर दुग्धाभिषेकाने या आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. आंदोलनाच्या पुर्वसंध्येपासूनच स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. सांगली, अमरावती, पुणे, औरंगाबाद, जालना, कोल्हापूर या ठिकाणी आंदोलकांनी दुधाचे टँकर अडवून रस्त्यांवर दुध ओतून देत सरकारविरोधात असलेला रोष व्यक्त केला. पोलिसांनीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली होती.

आज आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, गेल्यावर्षी शेतकर्‍यांचा संप झाला होता. तेव्हा दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी 27 रूपयांचा भाव जाहीर केला होता. मात्र तो दर शेतकर्‍यांना कधीच मिळाला नाही. राज्यात 20 लाख लिटर दुध अतिरिक्त आहे. या अतिरिक्त दुधावर राज्य सरकारने कधीच तोडगा काढला नाही. दुधाबाबत सरकारचे धोरण फसलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फक्त बघ्याची भुमिका घेतली आहे. त्यांनी आम्हाला चर्चेसाठी कधीच बोलावले नाही. त्यांनी निमंत्रण कधी दिले होते असे सांगत करत राजू शेट्टी यांनी मी कधी नकार दिला हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे असे थेट आव्हानच दिले. तसेच चर्चेला जर आम्हाला बोलावले असेल तर त्याचे पुरावेही जाहीर करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. जर आम्हाला न्याय मिळणार नसेल तर या मुख्यमंत्र्यांचे काय करायचे आहे हे पांडुरंग आणि जनताच ठरवेल, असा टोलाही त्यांनी लगावला. या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यात दुध माफिया तयार झाले असून त्यांनी 53 कोटींवर डल्ला मारल्याचा आरोपही यावेळी शेट्टी यांनी केला.

पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी सरकारने दूध दरप्रश्नी घेतलेल्या निर्णयांची माहिती आज सभागृहाला दिली. भुकटीसाठी जाहीर केलेले अनुदान पुढील पाच महिन्यांसाठी वाढवण्याचा विचार केला जाईल. तसेच केंद्र सरकारने भुकटीच्या निर्यातीसाठी 10 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच दुधासाठी धोरण ठरवले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. यावर असमाधानी असल्याचे सांगून विरोधकांनी विधानसभेत सरकारविरोधात गोंधळ, घोषणाबाजी सुरु केली. राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी दुग्धविकास मंत्री जानकर जूनीच माहिती सांगत असून त्यात नवीन काहीही नसल्याचा आरोप केला. दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर थेट जमा करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच दूध भुकटीसाठी जाहीर केलेले अनुदान खासगी संघांना डोळ्यासमोर ठेवून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्यात सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा

मुंबई – राज्यात विशेषत: मुंबईत सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे. राज्यात अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तुंची कमतरता नसून मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे....
Read More
post-image
मुंबई

शेअर बाजारात तेजी

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण होत असलेल्या मुंबई शेअर बाजारात आज सकाळपासूनच तेजीचे वातावरण आहे. त्यात बँकांच्या समभागात तेजी आल्यामुळे मुंबई शेअर...
Read More
post-image
महाराष्ट्र

मालेगावातील पावरलूम मालकांवर गुन्हे दाखल

नाशिक – राज्यातच नाही तर नाशिक जिल्ह्यातही सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना मालेगावात अनेक पावरलूम सुरूच होते. मात्र अखेर पाच पॉवरलूम मालकांवर गुन्हे दाखल...
Read More
post-image
महाराष्ट्र

घाटी रुग्णालयात डॉक्टर परिचारिकांचे स्क्रीनिंग सुरू

औरंगाबाद – औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या निवासी डॉक्टर आणि परिचारिकांची स्क्रिनिंग घाटी रुग्णालयात करण्यात येत आहे. कोरोनाच्या 3...
Read More
post-image
देश विदेश

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस यांची प्रकृती खालावली, पंतप्रधान मोदींनी केली विचारपूस

लंडन – १० दिवसांपूर्वी बोरिस यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर नियमित चाचणीसाठी त्यांना रुग्णालयात नेले असता प्रकृती खालावल्याने अतिदक्षता विभागात हलवण्यात...
Read More