राजस्थानमध्ये २२ जणांना जीका विषाणूची लागण – eNavakal
आरोग्य देश

राजस्थानमध्ये २२ जणांना जीका विषाणूची लागण

जयपूर – राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये २२ लोकांना जीका वायरसची लागण झाल्याची माहिती मिळाली असून पंतप्रधान कार्यालयाकडून या विषाणूच्या प्रसारणाबाबत आरोग्य मंत्रालयाकडून अहवाल मागवण्यात आला आहे. या वायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी राजस्थान सरकारकडून सात सदस्यीय उच्चस्तरीय टीम जयपूरमध्ये तैनात करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राकडून या विषाणूचे निरीक्षण करण्यासाठी एक नियंत्रण कक्ष देखील तयार करण्यात आला आहे.  या विषाणूमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

आरोग्य विभागाकडूनही जीका विषाणूवर नियंत्रण ठेवण्याचे काम सुरू आहे. जयपूरमधील जीका संशयास्पद रुग्णांवर तसेच या भागातील डासांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात येत आहे. तसेच गर्भवती महिलांवरही देखरेख ठेवण्यात येत आहे. आतपर्यंत जगभरातील ८६ देशांत जीका विषाणू पसरला आहे. भारतात जानेवारी २०१७ रोजी पहिल्यांदा अहमदाबादमध्ये हा विषाणू आढळून आला होता.

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
Uncategoriz

दिवाळीत साखर स्वस्त होणार

मुंबई – दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळ निघत अशी आरडाओरड करणाऱ्या रेशनकार्ड धारकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. साखर आणि डाळीच्या दरात घट करण्यात आली असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात वाढ

दिल्ली – केंद्र सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात ०.४ टक्के इतकी वाढ केली आहे. यामुळे व्याजदर...
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१६-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ई नवाकाळ’चे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस – रविंद्र वायकर यांच्यात संघर्ष पेटला

मुंबई –  आरे येथे असलेल्या आदिवासी पाड्यातील जवळपास २ हजार आदीवासींसाठी एसआरएची घरे उपलब्ध करून देत ही घरे किमान ४८० चौरस फुटाचे देण्याची घोषणा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

सलमान ‘भाई’ आणि ‘राणी’ दीपिकाचीच बॉलीवुडवर सत्ता

नवी दिल्ली – स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अहवालानुसार, सप्टेंबर 2017 ते सप्टेंबर 2018 या वर्षात डिजीटल न्यूज चार्टवर सर्वाधिक जास्त सलमान ‘भाई’ आणि ‘राणी पद्मावती’...
Read More