राजस्थानमध्ये कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी सुरू – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

राजस्थानमध्ये कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी सुरू

जयपूर – राजस्थानमध्ये राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी सुरू झाला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याशी चर्चेनंतर 23 मंत्र्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. नवनियुक्त २३ आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

राजस्थानमध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या निवडीवरून सस्पेन्स संपला असून मंत्रिमंडळावर शिक्कामोर्तब झाले. आज सकाळी 11.30 वाजता राजभवनात राज्यपाल कल्याण सिंह 13 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्यमंत्र्यांना शपथ देणार सुरुवात झाली आहे. २3 पैकी 10 जण पहिल्यांदाच मंत्री बनणार आहेत. तर पहिल्यांदाच निवडून आलेल्या 25 आमदारांपैकी कोणाच्याही गळ्यात मंत्री पदाची माळ पडलेली नाही. 11 महिला आमदारांपैकी केवळ 1 सिकरायच्या आमदार ममता भूपेश या मंत्री होणार आहेत. तर मुस्लिम समुदायातून पोकरणचे आमदार सालेह मोहम्मद यांना संधी देण्य़ात आली आहे. आघाडीतील मित्रपक्ष आरएलडीचे सुभाष गर्ग हे देखील मंत्री होणार आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
लेख

वत्तविहार : मराठीचा न्यूनगंड कायम

महाराष्ट्र सरकारला आपल्याच मातृभाषेचे महत्त्व समजत नसेल तर या सरकारच्या बुध्दीची जेवढी कीव करावी तेवढी थोडीच आहे. विशेषतः शिक्षण विभागाने मराठीबाबत जो काही खेळखंडोबा...
Read More
post-image
देश

भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार! सुरुवात ‘आयआरसीटीसी’पासून

नवी दिल्ली – भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या पाच ‘रेल्वे सेवांपैकी’ एक आहे. मोदी सरकारने भारतीय रेल्वेचे आता खाजगीकरण करायचे ठरविले आहे. कमी गर्दीच्या आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार! मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई – नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असून या प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, मुरुडसह 40 गावांमधील ग्रामस्थांचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सावजी हॉटेलना मिळणार दारूचा परवाना

नागपूर – नागपूर येथील प्रसिद्ध सावजी हॉटेलांमध्ये व धाब्यांवर दारू विकण्यास उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली आहे. यामुळे आता नागपुरात कायदेशीरपणे मद्यविक्री केली जाईल....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पवईत हॉटेलला आग; अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी

मुंबई – पवईतील हिरानंदानी परिसरात हॉटेलला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. देव कोरडकर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून...
Read More